पोलिसांना पकडून दिल्याचा राग; आरोपींनी घरात घुसून एकास उचलले, केली निर्घृण हत्या

By चेतनकुमार धनुरे | Published: June 10, 2023 01:24 PM2023-06-10T13:24:35+5:302023-06-10T13:25:54+5:30

पोलिसांनी सहाही आरोपींवर गुन्हा अपहरण तसेच खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Angry at being caught by the police, the accused entered the house and picked one up, brutally killing him | पोलिसांना पकडून दिल्याचा राग; आरोपींनी घरात घुसून एकास उचलले, केली निर्घृण हत्या

पोलिसांना पकडून दिल्याचा राग; आरोपींनी घरात घुसून एकास उचलले, केली निर्घृण हत्या

googlenewsNext

धाराशिव : पाेलिसांना एका गुन्ह्यात पकडून दिल्याचा राग व्यक्त करीत गुरुवारी सायंकाळी माळकरंजा येथील एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिराढोण ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींना ताब्यात घेईपर्यंत मृतदेह स्विकारणार नाही, असा पवित्रा शुक्रवारी सकाळी मृताच्या नातेवाईकांनी घेतला होता.

महादेव हिरा काळे (४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते माळकरंजा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी आशाबाई काळे यांनी दिलेल्या पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार महादेव काळे हे गुरुवारी सायंकाळी आपल्या घरी असताना ६ वाजण्याच्या सुमारास आरोपी विकास बब्रु काळे, सुरज पवार, गंगाराम पवार, बबलु पवार, खाजा पवार व रवि काळेचा मुलगा असे सहाजण घरात शिरले. त्यांनी जुनी कुरापत काढून भांडण सुरु केले. 

पूर्वीच्या एका गुन्ह्यात आम्हाला का पकडून दिले, अशी विचारणा करीत महादेव काळे यांना घरासमोर मारहाण केली. यानंतर जीपमध्ये घालून महादेव काळे यांना तेथून ते घेवून गेले. घरातील लाेक शोध घेत असताना उशिराने महादेव काळे यांचा मृतदेह मंगरुळ पाटी येथे पडल्याचे त्यांना समजले. आरोपींनी त्यांचे अपहरण करुन त्यांना जिवे मारुन मृतदेह मंगरुळ पाटी येथे टाकल्याचे आशाबाई काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शुक्रवारी शिराढोण पोलिसांनी सहाही आरोपींवर गुन्हा अपहरण तसेच खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Angry at being caught by the police, the accused entered the house and picked one up, brutally killing him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.