लोहाऱ्यात आणखी एक कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:35 AM2021-04-28T04:35:35+5:302021-04-28T04:35:35+5:30

लोहारा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या रुग्णांसाठी बेड शिल्लक नसल्यामुळे आयटीआय कॉलेजमध्ये दुसरे ...

Another Kovid Center in Lohara | लोहाऱ्यात आणखी एक कोविड सेंटर

लोहाऱ्यात आणखी एक कोविड सेंटर

googlenewsNext

लोहारा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या रुग्णांसाठी बेड शिल्लक नसल्यामुळे आयटीआय कॉलेजमध्ये दुसरे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. येथे शंभर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरासह तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची झपाट्याने वाढ होत असून तालुक्यात आतापर्यत १ हजार ५७२ रुग्ण आढळले आहेत. यापैकी १ हजार २१० रुग्ण उपराअंती बरे होऊन घरी गेले असून, ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरात ॲक्टीव्ह रुग्ण संख्या ५२ तर ग्रामीण भागात २७६ आहे. शहरासह तालुक्यात मागील आठवडाभरापासून दररोज ३० ते ४० ने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात होम आयसोलेसनमध्ये असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये १०० बेडची सोय होती. त्यात दोन दिवसापूर्वीच तहसीलदार संतोष रुईकर यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आणखी येथे २५ बेड वाढविले आहेत. परंतु, रुग्णांची वाढत असलेले संख्या लक्षात हे वसतिगृह आपुरे पडत असल्याने शहरातील आयटीआय कॉलेज प्रशासनाने ताब्यात घेतले असून, तहसीलदार संतोष रुईकर यांनी लगेच तेथे १०० बेडची व्यवस्था केली आहे. मंगळवारी रात्रीपासून या नवीन सुरु करण्यात आलेल्या आयटीआय कॉलेज मधील कोविड सेंटरमध्ये रुग्ण हालविण्यात आले आहेत.

चौकट....

नियम पाळा

लोहारा शहरासह तालुक्यात मागील आठवडाभरापासून रुग्ण वाढत असल्याने आरोग्य प्रशासनावरचा ताण देखील वाढत आहे. प्रशासनाकडून सर्वतोपरी आरोग्य सेवा पुरविण्याचे काम सुरुच आहे. नागरिकांनीही कामाशिवाय घराबाहेर पडून नये. तसेच नियमीत मास्क लावणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर या नियमांचे पालन करावे. लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन तहसीलदार संतोष रूईकर व तालुका आरोग्याधिकारी डॉ. अशोक कटारे

यांनी केले आहे.

Web Title: Another Kovid Center in Lohara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.