त्रैमासिक सांख्यिकी माहितीबाबत आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:31 AM2021-04-13T04:31:02+5:302021-04-13T04:31:02+5:30
पिकात बैल घातल्याच्या कारणावरून मारहाण उस्मानाबाद : कांद्याच्या पिकात बैल घातल्याच्या कारणावरून भांडण काढून एकास मारहाण झाल्याची घटना वाशी ...
पिकात बैल घातल्याच्या कारणावरून मारहाण
उस्मानाबाद : कांद्याच्या पिकात बैल घातल्याच्या कारणावरून भांडण काढून एकास मारहाण झाल्याची घटना वाशी तालुक्यातील कवडेवाडी येथे १० एप्रिल रोजी घडली. कवडेवाडी येथील साहेबराव कवडे हे १० एप्रिलरोजी त्यांच्या शेतात होते. यावेळी पिकात बैल सोडल्याचे कारण काढून बालाज ीकवडे यांनी साहेबराव यांना दगड व काठीने मारहाण केली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून एकास मारहाण
उस्मानाबाद : जुन्या वादातून एकास शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील खेड येथे ९ एप्रिल रोजी घडली. खेड येथील आयुब सय्यद हे त्यांच्या घरासमोर होते. यावेळी गावकरी मुस्तफा शेख, जावेद शेख यांनी मागील भांडणाचा वाद काढून आयुब यांना शिवीगाळ केली. तसेच लाथा-बुक्क्याने व दगडाने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी आयुब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १० एप्रिल रोजी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रक-कारची धडक; एकजण ठार
उस्मानाबाद : लातूर येथील अफरोज बागवान (हल्ली मुक्काम पुणे) हे ९ एप्रिल रोजी आई - वडिलांसह कारमधून (क्र.एमएच ०९/ एक्यू ४१११) जात होते. यावेळी एरंडवाडी पाटीजवळ ते आले असता, त्यांच्या कारला एमएच ४८/ टी ५१८० या क्रमांकाच्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून बागवान यांच्या कारला धडक दिली. या अपघातात गफर बागवान यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अफरोज बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवकाळीचा फटका
(फाईल फोटो घ्यावा)
लोहारा : तालुक्याच्या काही भागात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे केळी, द्राक्षे, चिंच, पपई, कलिंगड, खरबूज बागेसह रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले. अगोदरच कोरोनाचे संकट असताना, त्यातच पुन्हा अवकाळीच्या फटक्याने शेतकरी हतबल झाला आहे.
साईची निवड
उमरगा : तालुक्यातील तुरोरी येथील शिवराम प्राथमिक आश्रम शाळेतील पाचवी वर्गात शिकणाऱ्या साई श्रीपाद बरमदे याची सैनिक स्कूल प्रवेशासाठी निवड झाली आहे.साई याने या परीक्षेत गुणवत्ता यादीत राज्यात ३७ वा क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
योजनेस मंजुरी
उस्मानाबाद : जिल्ह्यात आगामी आर्थिक वर्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. यात शेतकरी कुटुंबातील दोघांना लाभ दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
नागरिक बेफिकीर
उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह येत असतानाही नागरिकांकडून मात्र मास्क, सॅनिटायझर वापरासह इतर नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जलवाहिनीला गळती
(फोटो : ००१ नावाने आहे)
उमरगा : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला सातत्याने कुठे ना कुठे गळती लागत आहे. यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.