नारळी मठ स्मशानभूमूचे रूपडे बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:24 AM2021-05-31T04:24:10+5:302021-05-31T04:24:10+5:30

माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सचिव विजयकुमार हिरेमठ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यासाठी सर्वांना एकत्र केले. या सर्वांनी प्रत्येक ...

The appearance of the Narli Math cemetery changed | नारळी मठ स्मशानभूमूचे रूपडे बदलले

नारळी मठ स्मशानभूमूचे रूपडे बदलले

googlenewsNext

माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सचिव विजयकुमार हिरेमठ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यासाठी सर्वांना एकत्र केले. या सर्वांनी प्रत्येक आठवड्यातील शनिवारी व रविवारी जाऊन स्वच्छता करण्याचे ठरविले होते; परंतु सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शहर बंद असल्याने दररोज सकाळी दोन तास वेळ देऊन सदर कार्य पूर्णत्वास नेले. या स्मशानभूमीत वाढलेली काटेरी-झुडुपे काढणे, सुकलेल्या झाडांना पाणी देणे, आळे करणे, परिसरात वाढलेल्या गवतावर औषध फवारणी करणे, संरक्षक भिंतीस रंगरंगोटी करून त्यावर घोषवाक्य लिहिणे, वृक्षारोपण आदी कामे या युवकांनी मार्गी लावली. यासोबतच मुक्या जनावरांना कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था, मयतावरील अंत्यसंस्कारासाठी आलेल्या वृद्धांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

याकामी नगरसेवक सिद्धलिंग स्वामी, उद्योजक धनराज धुम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चटगे, श्रीशैल मंगरुळे, राम डोंगरे, शरणाप्पा धुम्मा, गुंडप्पा पुराणे, श्रीशैल स्वामी, दयानंद स्वामी, सोमनाथ धुमुरे, वीरभद्र मोरखंडे, शिवपुत्र सोलापुरे, बसवराज भोसगे, रमेश पुराणे, संतोष येवले, संगमेश्वर करके, महादेव मुलगे, बादल गव्हाणे, स्वप्नील पांचाळ आदींनी पुढाकार घेतला. आगामी काळात मुरूम येथील सर्वच स्मशानभूमींची स्वच्छता करण्याचा आमचा मानस असल्याचे सामाजिक कार्यकर्ते देवराज संगुळगे यांनी सांगितले.

चौकट........

प्राण्यांसाठी बांधला पाण्याचा हौद...

स्मशानभूमी परिसरात असणाऱ्या व या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या मुक्या जनावरांना पाणी पिण्यासाठी पाण्याच्या हौदाचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. स्मशानभूमीत असलेल्या बोअरचे पाणी दररोज सकाळी पाइपच्या साहाय्याने या हौदामध्ये भरून ठेवण्यात येत आहे. सरंक्षक भिंतीचे रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून, त्या भिंतीवर महात्मा बसवेश्वरांची मार्गदर्शक वचने लिहिण्याचे काम किरण गायकवाड व देवराज संगुळगे मिळून करीत आहेत.

Web Title: The appearance of the Narli Math cemetery changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.