विज्ञान मंडळाकडून गुणवंतांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:37 AM2021-09-12T04:37:38+5:302021-09-12T04:37:38+5:30
येथील रोटरी क्लब सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष रामचंद्र गिड्डे होते. प्रारंभी युवा स्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ...
येथील रोटरी क्लब सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष रामचंद्र गिड्डे होते. प्रारंभी युवा स्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रप्रमुख सतीश हुंडेकरी, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र स्वामी, संघटक प्रकाश मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक तुळजापूर विज्ञान मंडळाचे संघटक आनंद कुलकर्णी, सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील व जळकोटे यांनी केले. कार्यक्रमासाठी तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सचिव शिवाजी राठोड, सहसचिव रवींद्र उपासे, कोषाध्यक्ष अमित चौधरी, प्रसिद्धी प्रमुख संगीता पटाडे, सदस्य रमेश जाधव, पल्लवी ठोकरे, रेवणसिद्ध आंधळकर, धनराज बरबडे, दयानंद येळकोट, गणेश गुंगे यांनी परिश्रम घेतले. तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव शिवाजी राठोड यांनी आभार मानले.
110921\1732-img-20210911-wa0024.jpg
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर व विद्यार्थी