४४ काेटी रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:33 AM2021-02-24T04:33:25+5:302021-02-24T04:33:25+5:30
कळंब (जि. उस्मानाबाद) -येथील नगर पालिकेच्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत ४४ काेटी ६१ लाख ४५ हजार रूपये खर्चाचे व २ ...
कळंब (जि. उस्मानाबाद) -येथील नगर पालिकेच्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत ४४ काेटी ६१ लाख ४५ हजार रूपये खर्चाचे व २ लाख ५८ हजारांचे शिलकी अंदाजपत्रक मंगळवारी झालेल्या सभेत मंजूर करण्यात आले. स्थायी समीतीने शिफारस केलेले अंदाजपत्रक मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेत मांडण्यात आले. यावर साधकबाधक चर्चा झाली. कोणतीही नवीन करवाढ नसलेला हे अंदाजपत्रक किरकोळ फेरबदल करीत सर्वसाधारण सभेने मंजूर केले. बियरबारच्या नाहरकतीसाठी आता ३० हजांर ऐवजी ३५ हजार रुपये एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. साेबतच दवाखान्यासाठी लागणार्या नाहरकतीसाठी ५ हजार ऐवजी ६ हजार रुपये घेतले जाणार आहेत. हे एक-दाेन घटक वगळता अन्य कुठल्याही करामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बाब कळंबकरांसाठी दिलासादायक मानली पाहिजे. बैठकीस नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, उपाध्यक्ष संजय मुंदडा, प्रभारी मुख्याधिकारी आशीष लोकरे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित हाेते.