आष्टा ग्रामस्थांचा पाणी प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:33 AM2021-05-27T04:33:56+5:302021-05-27T04:33:56+5:30
भूम : तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोग अंतर्गत निधीतून गावातील जिल्हा परिषद शाळा, मागासवर्गीय वस्ती याठिकाणी प्रत्येकी ...
भूम : तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोग अंतर्गत निधीतून गावातील जिल्हा परिषद शाळा, मागासवर्गीय वस्ती याठिकाणी प्रत्येकी एक बोअर व ६ पाण्याच्या टाक्या तसेच मागासवर्गीय वस्ती सुधार योजनेंतर्गत आणखी २ बोअर व दोन पाण्याच्या टाक्या असे एकूण चार बोअर घेतले. यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर झाली असून, बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत या जलदायिनीचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले.
आष्टा येथील मागासवर्गीय वस्तीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी दोन बोअर घेऊन दोन पाण्याच्या टाक्यांमधून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेत देखील १५ व्या वित्त आयोगामार्फत १ व मागासवर्गीय वस्तीत १ बोअर घेऊन सहा टाक्या बांधण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चारही बोअरला चार इंच पाणी लागले असून, यावर मोटार बसवून लोकार्पण करण्यात आले. यामुळे नागरिकांची पाण्याची सोय झाली आहे
यावेळी सरपंच सुनील जाधव, उपसरपंच आरती संभाजी नलवडे, हभप सतीश कदम महाराज, राजकुमार घरत, ग्रा. पं. सदस्य तात्यासाहेब आष्टेकर, रवींद्र वाघमारे धनंजय अंधारे, सतीश गिलबिले, संभाजी गिलबिले, तानाजी गिलबिले, जयराम शेळके, मयूर कवडे, विजय दौडे, विठ्ठल नलावडे, राजेश सोळसकर, किरण गिलबिले, अमर पाटील आदी उपस्थित होते.
फोटो -----
भूम तालुक्यातील आष्टा येथे बोअरच्या पाण्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सदस्य तात्यासाहेब आष्टेकर, सतीश कदम महाराज व अन्य.