संत गोरोबा काकांच्या समाधीला द्राक्षाची आकर्षक सजावट
By गणेश कुलकर्णी | Published: March 18, 2023 05:34 PM2023-03-18T17:34:24+5:302023-03-18T17:34:57+5:30
पापमोचनी एकादशीनिमित्त दर्शनासाठी गर्दी
तेर (जि. धाराशिव) : धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबाकाका यांच्या समाधी मंदिरात शनिवारी पापमोचनी एकादशी निमित्ताने द्राक्षाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
शनिवारी पापमोचनी एकादशी निमित्ताने धाराशिव तालुक्यातील जागजी व बार्शी तालुक्यातील ढोराळा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पहिल्यांदा काढण्यात आलेल्या द्राक्षाच्या फळांची संत गोरोबाकाका यांच्या समाधी मंदिरात ही सजावट केली होती. या सजावटीसाठी ७०० किलो द्राक्ष वापरले असून, यामुळे समाधी मंदिर आकर्षक दिसत होते. एकादशी निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे या सजावटीने लक्ष वेधले. ही सजावट करण्यासाठी मंदिराचे पुजारी धनंजय महाराज पुजारी, अविनाश महाराज तपिसे, हभप गोविंद महाराज पांगरकर, ध्रवराज महाराज पुजारी, संजय जाधव यांनी सहकार्य केले.