‘लाेकमंगल’ला बिलासाठी ठाेकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:16+5:302021-04-29T04:24:16+5:30

ऊसउत्पादक शेतकरी आक्रमक -२ हजार ५२५ प्रमाणे बिल देण्याची मागणी लोहारा : लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली ...

Avoid ‘Lakmangal’ for the bill | ‘लाेकमंगल’ला बिलासाठी ठाेकले टाळे

‘लाेकमंगल’ला बिलासाठी ठाेकले टाळे

googlenewsNext

ऊसउत्पादक शेतकरी आक्रमक -२ हजार ५२५ प्रमाणे बिल देण्याची मागणी

लोहारा : लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली साखर कारखाण्याच्या गेटला ऊसबिल मागणीसाठी बुधवारी ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी टाळे टोकून आंदोलन केले आहेत.

लोहारा खु येथील शेतकऱ्यांनी ऊस बील मागणीसाठी २३ एप्रिल रोजी लोकमंगल माऊली साखर कारखाण्याचे कार्याकारी संचालक यांना निवेदन देऊन २७ एप्रिलपर्यंत ऊसबिलाची रक्कम २ हजार ५२५ रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बॅंक खातेवर जमा करावी. अन्यथा २८ एप्रिल रोजी सर्व ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. परंतु, कारखान्याकडून कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी २८ एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन करत साखर कारखाण्याच्या गेटला कुलूप ठाेकले. यावेळी शेतकरी आप्पा रसाळ, व्यंकट पाटील, संभाजी पाटील, सुग्रीव पाटील, हरी गाढवे, बलभीम रसाळ, रविंद्र रसाळ, भास्कर रसाळ, अर्जुन रसाळ, बालाजी सूर्यवंशी, सचिन बाळू रसाळ, सुधाकर राठोड, भास्कर रसाळ, दत्ता मारुती सुर्यवंशी, अर्जुन किसनराव रसाळ, अजय रसाळ आदी आदींची उपस्थिती हाेती.

Web Title: Avoid ‘Lakmangal’ for the bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.