माकडाचा साडेतीनशे जणांना चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 05:29 AM2018-07-15T05:29:50+5:302018-07-15T05:30:00+5:30

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील ग्रामस्थ माकडांच्या दहशतीखाली वावरत आहेत.

Bacon | माकडाचा साडेतीनशे जणांना चावा

माकडाचा साडेतीनशे जणांना चावा

googlenewsNext

- दत्ता पवार 
येडशी (जि. उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील ग्रामस्थ माकडांच्या दहशतीखाली वावरत आहेत. सात महिन्यांत माकडांनी तब्बल साडेतीनशेवर ग्रामस्थांना चावा घेतला असून यातील अर्ध्याअधिक लोकांना एकाच माकडाने लक्ष्य केले आहे़ त्याच्या बंदोबस्तासाठी ग्रामपंचायत अन् वनविभाग जंग जंग पछाडत आहे. त्यावर आतपर्यंत तब्बल दीड लाख रुपये खर्च झाला आहे.
दहा वर्षांपूर्वी येडशी गावात दोन माकडे आली होती. त्यांची संख्या वाढत जाऊन आता त्यांची मोठी टोळीच तयार झाली आहे. टोळीतील बहुतांश माकडे उपद्रवी असून बसस्थानक, सोलवट गुरव नगर, जमादार बाबा दर्गाह व मुख्य रस्ता परिसरात अठरा ते वीस माकडांच्या टोळीने उच्छाद मांडला आहे. ते वयोवृद्धांसह लहान मुलांवर हल्ला चढवित आहेत. त्यामुळे लहान मुलांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

Web Title: Bacon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Monkeyमाकड