खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:10 AM2021-09-02T05:10:42+5:302021-09-02T05:10:42+5:30
तामलवाडी ते देवकुरूळी या रस्ता दुरुस्तीसाठी खुद्द उपसभापती दत्तात्रय शिंदे यानी देवकुरूळी, पिंपळा (बु.) या दोन गावच्या गावकऱ्यांना ...
तामलवाडी ते देवकुरूळी या रस्ता दुरुस्तीसाठी खुद्द उपसभापती दत्तात्रय शिंदे यानी देवकुरूळी, पिंपळा (बु.) या दोन गावच्या गावकऱ्यांना सोबत घेऊन दोन दिवसीय बेमुदतउपोषण केले होते. त्यानंतर पिंपळा (बु) ते तामलवाडी या मार्गावरील दोन किमीचे डांबरीकरण झाले; परंतु उर्वरित रस्त्याचे काम झालेच नाही. त्यामुळे हा मार्ग खड्ड्यात गेला आहे. थाेडाबहुत पाऊस झाला तरी या खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप येते. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीसारखी वाहने आदळून अपघाती घटना घडत आहेत. पिंपळा (बु.) येथील बाळू महादेव शेणमारे (वय २३) हे दुचाकीवरून जात हाेते. रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी त्यात आदळली. या अपघाती घटनेत ते गंभीर जखमी झाले. उपचारकामी त्यांना लाखाेंचा खर्च आला. अशा अपघातांचे सत्र सुरू असतानाही रस्त्याच्या डागडुजीकडे कानाडाेळा हाेत आहे.
चौकट
निधी मंजूर, पावसाळ्यानंतर कामास गती येईल
तामलवाडी ते पिंपळा (बु.) या रस्तासाठी ४४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कामाची वर्क ऑर्डर निघाली आहे. पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. उर्वरित १२ लाख एवढ्या निधीची मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
-दत्तात्रय शिंदे, उपसभापती, तुळजापूर.
खड्डेमय मार्गावरून ये-जा करताना सातत्याने लहान-माेठे अपघात घडत आहेत. धाेकादायक वळणार झाडेही वाढली आहेत. त्यामुळे वळणाचा अंदाज न आल्यानेही दुर्घटना घडतात. हा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने उपाययाेजना कराव्यात.
-बालजी चुंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य, पिंपळा बु.
पिंपळा बु''