सावधान ! वाहनांखाली जॅक टाकून चाेरट्यांकडून लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 02:31 PM2020-12-30T14:31:57+5:302020-12-30T14:40:12+5:30

अंधारात दबा धरून बसलेल्या दराेडेखाेरांनी कारला गराडा घालून आतील लाेकांना चाकूचा धाक दाखवत काठीने मारहाण केली.

Be careful! Robbery by throwing jacks under vehicles | सावधान ! वाहनांखाली जॅक टाकून चाेरट्यांकडून लुटमार

सावधान ! वाहनांखाली जॅक टाकून चाेरट्यांकडून लुटमार

googlenewsNext
ठळक मुद्देसात लाखांचा ऐवज लांबविला साेलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर थरार

येरमाळा (जि. उस्मानाबाद) : लग्नकार्य आटाेपून पंढरपूरकडे परतणाऱ्या एका कुटुंबीयाच्या भरधाव कारखाली चाेरट्यांनी जॅक टाकला. गाडीच्या खाली काही तरी वाजू लागल्यानंतर चालकाने कार थांबविली. तेवढ्यात अंधारात दबा धरून बसलेल्या दराेडेखाेरांनी कारला गराडा घालून आतील लाेकांना चाकूचा धाक दाखवत काठीने मारहाण केली. यानंतर महिला, पुरूषांच्या अंगावरील दागिने तसेच राेख रक्कम मिळून सुमारे ७ लाख १२ हजारांचा ऐवज लंपास केला. ही थरारक घटना साेमवारी मध्यरात्री साेलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नाथवाडी पाटी नजीक घडली.

साेलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील लाड कुटुंबीय लग्नकार्यासाठी कारमधून (क्र. एमएच १३ सीएस ७३०८) अकाेला येथे गेले हाेते. हा साेहळा आटाेपल्यानंतर लाड कुटुंबीय साेमवारी रात्री साेलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गाने पंढरपूरकडे जात हाेते. ते नाथवाडी पाटीनजीक आले असता कारखाली कशाचा तरी आवाज आला. त्यामुळे कार थांबवून चालक खाली उतरला असता, रस्त्याच्या कडेला अंधारात दबा धरून बसलेल्या अज्ञात सहा जणांनी चालकास चाकू, काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर काहींनी कारमधील दाेन महिला व तीन पुरूषांकडील साेन्याच्या ३१ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या, ४१ ग्रॅम वजनाचे गंठण, ३५ ग्रॅमची चेन, ७० ग्रॅमचा साेन्याचा हार असे एकूण २० ताेळे साेने, ४७ हजार ५०० रुपये किमतीचे चार माेबाईल व राेख ६१ हजार रुपये असे एकूण सुमारे ७ लाख १२ हजार सहाशे रुपये लुटून अवघ्या अर्ध्या तासात दराेडेखाेर पसार झाले. याप्रकरणी निखिल विजय लाड (रा. पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पाेलीस ठाण्यात अज्ञात सहा जणांविरूद्ध २९ डिसेंबर राेजी दराेड्याचा गुन्हा नाेंदविण्यात आला.

एकाच क्रमांकाच्या दाेन दुचाकी...
येरमाळा पाेलीस पंचनाम्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांना तेथे एकाच क्रमांकाच्या दाेन दुचाकी आढळून आल्या. त्यामुळे सदरील दुचाकी काेणाच्या नावे आहेत? काेठून आणल्या आहेत? याचा पाेलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Be careful! Robbery by throwing jacks under vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.