सावधान! वरवंटी शिवारात बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये घबराट

By सूरज पाचपिंडे  | Published: October 4, 2023 03:24 PM2023-10-04T15:24:59+5:302023-10-04T15:25:24+5:30

वन विभागाचे पथक गस्तीवर

Beware! Sighting of leopard in Varvanti Shivar, panic among villagers | सावधान! वरवंटी शिवारात बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये घबराट

सावधान! वरवंटी शिवारात बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये घबराट

googlenewsNext

धाराशिव : तालुक्यातील वरवंटी, वडगाव सिद्धेश्वर, कामंठा, आपसिंगा परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थांमध्ये होती. शनिवारी एक वासरू मृत अवस्थेत आढळून आल्याने बिबट्याचा वावर असल्याचा संशय बळावला होता. सोमवारी वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचे छायाचित्र टिपल्याने बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी वनविभागाचे पथक वरवंटी, वडगाव, कामंठा परिसरात गस्तीवर आहे.

मागील पंधरा दिवसांपासून येडशी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. गेल्या चार दिवसांपासून वरवंटी शिवारात बिबट्या आढळून आल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात होते. शनिवारी वरवंटी येथील सलाऊद्दीन शेख यांच्या वासराची शिकार बिबट्याने केल्याने वन विभागाचे पथक गेल्या दोन दिवसांपासून वरवंटी, कामंठा, वडगाव सिद्धेश्वर, आपसिंगा शिवारात गस्तीवर आहे.

सोमवारी सायंकाळी वरवंटी शिवारातील जंगलात बिबट्याचे चित्र वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले गेले. त्यामुळे विभागीय वन अधिकारी बी. ए. पोळ, सहायक वनसंरक्षक वृषाली तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. ए. चौगुले यांनी मंगळवारी परिसरात जाऊन पाहणी केली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वन विभागाचे पथक गस्तीवर होते. नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Web Title: Beware! Sighting of leopard in Varvanti Shivar, panic among villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.