भरधाव कार उलटली; एक ठार, तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:08+5:302021-07-22T04:21:08+5:30
रत्नागिरी-तुळजापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले असून, काक्रंबा येथील उड्डाणपुलाचे काम मात्र अजूनही अर्धवट आहे. यामुळे येथे नेहमीच ...
रत्नागिरी-तुळजापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले असून, काक्रंबा येथील उड्डाणपुलाचे काम मात्र अजूनही अर्धवट आहे. यामुळे येथे नेहमीच अपघात होत आहेत. मंगळवारी रात्री लातूर येथील वाल्मिक माणिकराव गोबाडे व अन्य तिघे एमएच २४/ एबी ०५०९ या नंबरच्या कारमधून सोलापूरकडे जात होते. काक्रंबा येथील उड्डाणपुलाजवळ चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्याने ही कार दोन पलट्या मारून रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. येथील सचिन म्हेत्रे यांना अपघाताची माहिती समजताच, त्यांनी तातडीने १०८ या नंबरवर फोन करून, रुग्णवाहिका मागून जखमींना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. यामध्ये वाल्मिक माणिकराव गोबाडे (वय ५२) यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. दरम्यान, चार दिवसांपूर्वी एमएच १२/ एचएन ४०४० हे वाहनही खड्ड्याचा अंदाज न आल्याने याच ठिकाणी उलटले होते.
210721\img_20210721_162746.jpg
अपघात ग्रस्त कार