भरधाव कार उलटून दुसऱ्या वाहनावर आदळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:43 AM2021-01-08T05:43:13+5:302021-01-08T05:43:13+5:30
अपघात - महिलेसह चाैघे जण जखमी काक्रंबा (जि. उस्मानाबाद) : भरधाव कार उलटून दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळली. या भीषण ...
अपघात - महिलेसह चाैघे जण जखमी
काक्रंबा (जि. उस्मानाबाद) : भरधाव कार उलटून दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून अन्य तिघे किरकाेळ जखमी आहेत. ही घटना साेमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास येथील उड्डाणपुलानजीक घडली.
नागपूर- तुळजापूर- रत्नागिरी हा महामार्ग काक्रंबा येथून गेला आहे. या महामार्गाचे तुळजापूर ते औसा अशा ५५ किमीचे काम पूर्ण झाले आहे. सध्या केवळ काक्रंबा येथील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. नेमक्या याच भागात माेठमाेठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात हाेत आहेत. सामेवारी रात्री भरधाव कारच्या (एमएच-०५ डी- ६६६५) चालकास खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही कार उलटून दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळली. या अपघातात साईनी राधा यल्ला रेड्डी (वय ४०), रम्मया साईन यल्लारेड्डी (वय १८), लक्का भूलक्ष्मी (वय ४०, सर्व रा. तेलंगणा), किशोर धनाजी गोडुके (वय ३४, चालक, रा. साेलापूर) हे चाैघे जण जखमी झाले आहेत. यातील महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले. या सर्व जखमींवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
चाैकट...
लाॅकडाऊन उठल्यापासून पुलानजीक जवळपास ७० ते ८० दुर्घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाण अधिक आहे. सततच्या अपघाती घटनांना रस्त्यालगत घरे असलेले लाेक कंटाळले आहेत. जखमींना वाहनातून बाहेर काढणे, त्यांना तुळजापूरच्या दवाखान्यात पाठवून देणे, आमच्यासाठी आता नित्याचेच झाले आहे.
-ॲड. नीळकंठ वट्टे, काक्रंबा
रस्त्यालगत माझे घर आहे. तीन दिवसांपूर्वी अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव कार आमच्या घरात घुसली हाेती. मात्र, संबंधित खाेलीत काेणीही नव्हते. त्यामुळे माेठा अनर्थ टळला.
-सचिन म्हेत्रे, काक्रंबा
050121\05osm_1_05012021_41.jpg
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावानजीक साेमवारी रात्री भरधाव कार उलटून दुसर्या वाहनावर आदळली. अपघातग्रस्त कारचे हे छायाचित्र.