चुरशीच्या लढतीत भोसले यांची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:43 AM2021-02-27T04:43:27+5:302021-02-27T04:43:27+5:30

उस्मानाबाद : अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा विधिज्ञ मंडळाची गुरुवारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. मतदानानंतर लागलीच झालेल्या मतमोजणीचे निकाल जाहीर ...

Bhosale's victory in the battle of Churshi | चुरशीच्या लढतीत भोसले यांची सरशी

चुरशीच्या लढतीत भोसले यांची सरशी

googlenewsNext

उस्मानाबाद : अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा विधिज्ञ मंडळाची गुरुवारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. मतदानानंतर लागलीच झालेल्या मतमोजणीचे निकाल जाहीर झाले असून, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. नितीन भोसले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. विष्णू डोके यांच्यावर २५ मतांनी मात करीत विजयश्री संपादन केली.

जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या निवडणुकीत अध्यक्ष वगळता अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. विष्णू डोके, अ‍ॅड. नितीन भोसले व अ‍ॅड. भाऊसाहेब बेलुरे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मतदानाच्या एक दिवस अगोदर अ‍ॅड. भाऊसाहेब बेलुरे यांनी अ‍ॅड. विष्णू डोके यांना पाठिंबा दिला होता. गुरूवारी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर लागलीच मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. यात अ‍ॅड. नितीन भोसले यांचा २९ मतांनी विजय झाला. अ‍ॅड. विष्णू डोके यांना एकूण २१६ तर भोसले यांना २४५ मते मिळाली आहेत. अ‍ॅड. भाऊसाहेब बेलुरे यांना केवळ पाच मते मिळाली. तर चार मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.

यावेळी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. शेषेराव काजळे यांनी काम पाहिले. तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. ज्योती बडेकर, अ‍ॅड. प्रतीक देवळे व अ‍ॅड. विलास चौरे यांनी काम पाहिले. निवडीनंतर अ‍ॅड. भोसले यांच्या समर्थकांनी पुष्पहार घालून, पेढे भरवून व गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.

असे आहे नवीन मंडळ...

जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या एक वर्षाच्या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी अ‍ॅड. नितीन भोसले, उपाध्यक्ष अ‍ॅड. अतुल देशमुख, अ‍ॅड. क्रांतीसिंह ढेंगळे, सचिव अ‍ॅड. तानाजी चौधरी, कोषाध्यक्ष भाग्यश्री कदम-जोमदे, सहसचिव अ‍ॅड. अरूणा गवई, महिला प्रतिनिधी अ‍ॅड. आकांक्षा माने, अ‍ॅड. अश्विनी सोनटक्के यांची मंडळात वर्णी लागली.

Web Title: Bhosale's victory in the battle of Churshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.