भूम-जालना बससेवा पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:34 AM2021-07-27T04:34:05+5:302021-07-27T04:34:05+5:30
भूम : गेल्या पाच-सहा वर्षांपासून बंद असलेली भूम-जालना ही बससेवा व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली. वाहतूक नियंत्रक ...
भूम : गेल्या पाच-सहा वर्षांपासून बंद असलेली भूम-जालना ही बससेवा व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली. वाहतूक नियंत्रक अच्युत आठवले यांच्या हस्ते पूजन करून सेवेचा शुभारंभ झाला. यावेळी वाहतूक निरीक्षक श्रीकांत सुरवसे, धनंजय माळी, कामगार संघटना अध्यक्ष नितीन मुळे, चालक आर. पी. औताडे, प्रवासी मित्र मुकेश भगत यांच्यासह चालक-वाहक व प्रवासी उपस्थित होते. ही बस दुपारी अडीच वाजता भूम बसस्थानकातून सुटणार आहे. बीडमार्गे ९ स्टॉप करत संध्याकाळी ७ वाजता जालना येथे पोहोचणार आहे. या गाडीने भूम शहर व परिसरातील व्यापाऱ्यांना जालना येथे जाण्याची सोय झाली आहे.
260721\img-20210726-wa0075.jpg
भूम फोटो भूम ते जालना बससेवेचा शुभारंभ करताना वाहतुक नियंत्रक अच्युत आठवले वाहतुक निरिक्षक श्रीकांत सुरवसे धनंजय माळी कामगार संघटना अध्यक्ष नितीन मुळे वाहक व चालक