शेळका धानोरा येथील सभा मंडपाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:58+5:302021-07-26T04:29:58+5:30
कळंब : आ. कैलास घाडगे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीमधून शेळका धानोरा येथील गोविंद बाबामठ देवस्थान परिसरात सभागृह बांधकाम ...
कळंब : आ. कैलास घाडगे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीमधून शेळका धानोरा येथील गोविंद बाबामठ देवस्थान परिसरात सभागृह बांधकाम करण्यासाठी सात लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प शाहु महाराज भारती यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मेटे, प्रवीण कोकाटे, भीमा जाधव, रुकसाना बागवान, उपसरपंच शिलाताई इंगळे, युवासेना विस्तारक अविनाश खापे, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, मोहाचे उपसरपंच सोमनाथ मडके, संतोष शेळके, चंद्रकांत कोरे, प्रभाकर शेळके, सुनील शेळके, विश्वजित लोकरे, समाधान शेळके, शंकर कोरे, जालिंदर बाळगे, चेअरमन नानासाहेब शेळके, ग्रा. पं. सदस्य अनंत इंगळे, विशाल पुरेकर, गजेंद्र महाराज लिके, मगन शेळके, राजा कसबे, ऋषी पुरेकर आदी उपस्थित होते.