दुधी आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:12+5:302021-06-30T04:21:12+5:30
परंडा : तालुक्यातील दुधी येथील नियोजित आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते सोमवारी ...
परंडा : तालुक्यातील दुधी येथील नियोजित आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते सोमवारी झाले. ८८ लाख रुपये खर्च करून ही इमारत उभारण्यात येत असून, याचा फायदा रुई, दुधी, बावची, दहिटणा, बोडका आदी गावांतील रुग्णांना होणार आहे. हे आरोग्य उपकेंद्र सन २०११ मध्ये मंजूर झालेले होते. जि. प. उपाध्यक्ष सावंत यांनी यास मान्यता घेऊन काम मार्गी लावले. या वेळी माजी सरपंच शंकर जाधव, जि. प. सदस्य सुनीता जाधव, धनंजय पाटील, ग्रा. पं. सदस्य पार्वती जाधव, गोविंद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जहूर सय्यद, डॉ. अबरार पठाण, लक्ष्मण कवठे, वसुदेव बोबडे, पोपट जाधव, ग्रामसेवक राठोड, दत्तात्रय लिमकर, प्रवीण मुळीक, मारुती येवारे, सुरेश कवठे आदी उपस्थित होते.