भाजपाची भाजप बुथ समिती बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:30 AM2021-07-26T04:30:00+5:302021-07-26T04:30:00+5:30
यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी एकूण ५ जिल्हा परिषद गटानुसार बुथ कमिटीचा आढावा घेतला. बैठकीस २८ पैकी २५ ...
यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी एकूण ५ जिल्हा परिषद गटानुसार बुथ कमिटीचा आढावा घेतला. बैठकीस २८ पैकी २५ शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले. सक्षम बूथ बनविणे, महिला सदस्यांचा समावेश करणे, सर्वसमावेशक बूथ रचना आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. बैठकीस प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, ॲड. खंडेराव चौरे, नेताजी पाटील, लोकसभा बुथ समन्वयक शिवाजी गिड्डे-पाटील, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, विठ्ठल तिपाले, ॲड. गणेश खरसडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.