भाजप पदाधिकाऱ्यांचा तांदुळवाडीत सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:59 AM2021-02-18T04:59:55+5:302021-02-18T04:59:55+5:30
सेवालाल महाराजांची जयंती साजरी उमरगा : येथील जीप चालक - मालक संघटनेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी ...
सेवालाल महाराजांची जयंती साजरी
उमरगा : येथील जीप चालक - मालक संघटनेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील भाजी मंडई परिसरात आयोजित कार्यक्रमास ॲड. दिनकर जाधव, धोंडीराम पवार, प्रा. गुलाब राठोड, सुनील राठोड, गोपी पवार, शिवाजी चव्हाण, संघटनेचे अध्यक्ष सुभाष सोनकांबये, उपाध्यक्ष विनोद माळी, अमोल पवार, स्वप्नील राठोड, अविनाश राठोड, बाळू चव्हाण, आकाश चव्हाण, तानाजी व्हन्नाळे, भास्कर जाधव, कपिल चव्हाण, विकास पवार, विशाल राठोड, अरूण पवार आदी उपस्थित होते.
दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर टाकले छापे
उस्मानाबाद : पोलीस प्रशासनाने १५ फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. येथील शहर पोलिसांनी शहरातील रूद्र इलेक्ट्रॉनिक्स समोर छापा टाकला असता शाम पेठे हे जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह मिळून आले. तसेच ढोकी पोलिसांनी ढोकी येथे छापा टाकला. यावेळी माजीद शेख हे जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह मिळून आले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घरासमोर लावलेली दुचाकी गेली चोरीस
उस्मानाबाद : घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील काटी येथे १४ व १५ फेब्रुवारीच्या रात्री घडली. काटी येथील महेश साळुंखे यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २५/ एई ७८७२) हे १४ व १५ फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या घरासमोर लावली होती. रात्री चोरट्यांनी ती चोरून नेली. दुसऱ्या दिवशी दुचाकी जागेवर न दिल्याने साळुंखे यांनी शोधाशोध केली. परंतु, ती सापडली नसल्याने अखेर तामलवाडी पोलीस ठाण्यात दुचाकीच्या चोरीची फिर्याद त्यांनी दाखल केली. यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
खासगी बसची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू
नळदुर्ग : खासगी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी येथील बालघाट महाविद्यालयासमोर घडली. चिकुंद्रा येथील दिलीप गायकवाड हे या रस्त्यावरून पायी जात असताना केए ५१/ सी ४१६८ या लक्झरी बसच्या चालकाने निष्काळजीपणे बस चालवून गायकवाड यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात गायकवाड यांचा जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी नागनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा
वाशी : कार व दुचाकीची धडक होऊन एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ जानेवारी रोजी सरमकुंडी फाटा रोडवर घडली होती. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील दर्कासपेठ येथील महेबूब मुलाणी यांनी त्यांच्या ताब्यातील कार (क्र. केए ३२/ डी ५९२१) ही निष्काळजीपणे चालवून एमएच २५/ एसी ३५१९ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात नाना भीमराव गिरी (रा. सरमकुंडी) यांचा मृत्यू झाला तर भारत गिरी हे जखमी झाले. याप्रकरणी युवराज गिरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
हरभरा काढणी सुरू
उमरगा : तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर झालेल्या हरभरा काढणीचे काम सध्या जोरात सुरू आहे. दरम्यान, ऐन बहरात आलेल्या हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. आगोटी पेरणी क्षेत्रात मात्र चांगला उतार आहे.
ऊस तोडणीला वेग
कळंब : परिसरातील साखर कारखाने व गूळ पावडर कारखाने सुरू झाले असल्यामुळे तालुक्यात सध्या ऊस तोडणी जोरात सुरू आहे. यंदा चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीपातळीत वाढ होऊन उसाची वाढही चांगली झाल्याचे दिसत आहे.
गतिरोधक हवा
कळंब : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ढोकी मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे सध्या वेगात वाहतूक सुरू आहे . त्यामुळे या मार्गावरील ढोकी नाका या ठिकाणी अपघाताचा धोका वाढल्यामुळे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
जाधव यांची निवड
परंडा : तालुक्यातील कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा जाधव तर उपसरपंचपदी संतोष भुजे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नूतन सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
गोटखा विक्री सुरुच
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेरसह परिसरात महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. जवळपास सर्वच ठिकाणी याची जादा दराने विक्री होत असून, प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.