मराठा, ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा चक्काजाम आंदाेलन -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:37+5:302021-06-27T04:21:37+5:30

तामलवाडी-येडशी - मराठा तसेच ओबीसी आरक्षण देण्यास राज्यातील माविकास आघाडीचे सरकार असमर्थता दर्शवीत आहे. समाजबांधवांतील संताप लक्षात घेता, शासनाने ...

BJP's Chakkajam agitation for Maratha, OBC reservation - | मराठा, ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा चक्काजाम आंदाेलन -

मराठा, ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा चक्काजाम आंदाेलन -

googlenewsNext

तामलवाडी-येडशी - मराठा तसेच ओबीसी आरक्षण देण्यास राज्यातील माविकास आघाडीचे सरकार असमर्थता दर्शवीत आहे. समाजबांधवांतील संताप लक्षात घेता, शासनाने तातडीने आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व उस्मानाबाद तालुक्यातील येडशी टाेलनाक्यावर चक्का जाम आंदाेलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली हाेती.

मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने राज्यव्यापी चक्का जाम आंदाेलनाची हाक दिली हाेती. त्यानुसार शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास साेलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी टाेलनाका येथे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदाेलनाला सुरुवात करण्यात आली. हे आंदाेलन जवळपास अर्धा तास चालले. परिणामी राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची लांबच लांब रांग लागली हाेती. या आंदाेलनामध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, आनंद कंदले, जिल्हा परिषदेचे सदस्य राजकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शिंदे, नारायण नन्नवरे, गुलचंद व्यवहारे, साहेबराव घुगे, गणेश सोनटक्के, बाळासाहेब शामराज, काटीचे सरपंच आदेश कोळी, बापूसाहेब कणे, शहाजी लोंढे, मारुती रोकडे, दत्तात्रय वडणे, ज्ञानेश्वर माळी, बाबासाहेब गुंड, नरसिंग धावणे, बाळासाहेब भाले, मनोज धावणे, रामलिंग सगर, पद्माकर मुळे, हरिभाऊ काळदाते, ज्ञानेश्वर गंजे, विजय निंबाळकर, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके, लक्ष्मण शेंडगे, रवी मगर, विश्वास मगर, सुलेमान शेख, आदी सहभागी झाले हाेते.

चाैकट...

आंदाेलनस्थळी तगडा बंदाेबस्त

तामलवाडी टोलनाक्यावर भाजपच्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस अधिकारी, २२ पाेलीस अंमलदार, २२ पोलीस कर्मचारी, १९ होमगार्ड असा ६५ जणांचा तगडा बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

चारशे वाहने टाेल न भरता साेडून दिली

तामलवाडी टाेलनाक्यावर जवळपास अर्धा तास चाललेल्या चक्का जाम आंदाेलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली हाेती. आंदाेलनाची सांगता झाल्यानंतर अडवून ठेवलेली जवळपास ४०० वाहने टाेल न भरता साेडून देण्यात आली. आंदाेलनावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ३० राजकीय कार्यकर्त्यांना नाेटीस बजावली हाेती.

Web Title: BJP's Chakkajam agitation for Maratha, OBC reservation -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.