१६ जुलैला तुळजापुरात होणार रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:18+5:302021-07-15T04:23:18+5:30
तुळजापूर : लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमांतर्गत १६ जुलै रोजी तुळजापूर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या ...
तुळजापूर : लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमांतर्गत १६ जुलै रोजी तुळजापूर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमत व नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
१६ जुलै रोजी तुळजापुरातील सराया धर्मशाळा कमान वेस येथे सकाळी १० ते ५ या वेळेत होणाऱ्या शिबिरात नगरपालिकेसह रोटरी क्लब, युवा स्पंदन सामाजिक संस्था, तुळजाई सांस्कृतिक मंडळ, मराठवाडा सामाजिक संस्था, तुळजाभवानी पुजारी मंडळ, अंबिका तरुण मंडळ, सारा गौरव सांस्कृतिक मंडळ, नवनिर्माती महिला मंडळ, जिव्हाळा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, आठवण ग्रुप, सागर कदम मित्र परिवार व शहरातील विविध सामाजिक संस्था सहभागी होत आहेत. या रक्तदानाच्या महायज्ञात जास्तीत-जास्त इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ढोकीत १७ रोजी शिबिर...
लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमांतर्गत १७ जुलै रोजी ढोकी येथेही रक्तदान शिबिर होणार आहे. लोकमत व शिवसेना ढोकी शाखेच्या पुढाकाराने खा. ओम राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे. या शिबिरासाठी ढोकी शिवसेना शाखेच्या वतीने पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे.