उस्मानाबाद ‘बीईओ’ कार्यालयात रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:26 AM2021-01-04T04:26:39+5:302021-01-04T04:26:39+5:30
उस्मानाबाद : महिला शिक्षणदिनी येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी जवळपास २० शिक्षिकांनी रक्तदान केले. या ...
उस्मानाबाद : महिला शिक्षणदिनी येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी जवळपास २० शिक्षिकांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यापीठावर गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे, अर्जुन पुरस्कारप्राप्त सारिका काळे, सहायक गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, गटशिक्षण अधिकारी राेहिणी कुंभार, विजयश्री फड यांची प्रमुख उपस्थिती हाेती. रक्तदान शिबिरासाठी तालुक्यातील ४५ शिक्षिकांनी नाेंदणी केली हाेती. यापैकी पात्र २० महिलांनी रक्तदान केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. फड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जाे काेणतेही काम अगाेदर करताे व नंतर दुसऱ्याला सांगताे, ताेच खरा आदर्शवादी शिक्षक असताे आणि ते आज महिला शिक्षक भगिनींनी सार्थ करून दाखविले आहे. उस्मानाबाद गटशिक्षण अधिकारी कार्यालयाने क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी महिला शिक्षिकांचे रक्तदान करून समाजाला वेगळा संदेश दिला आहे. पुरुषांसाेबतच महिलांनीही प्रत्येक क्षेत्रात अशी स्पर्धा केली तर देश वेगळ्या उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी राेहिणी कुंभार यांनी केले, तर आभार संजीव बागल यांनी मानले.
चाैकट...
अध्यक्षांनी दिली शिबिराला भेट
जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी महिला शिक्षिका रक्तदान शिबिरास भेट दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निपाणीकर, शिक्षणाधिकारी डाॅ. अरविंद माेहिरे यांचीही उपस्थिती हाेती.