परंड्यात २६५ दात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:06+5:302021-07-01T04:23:06+5:30

(फोटो : विजय माने ३०) परंडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंडा पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात ...

Blood donation was made by 265 donors in Paranda | परंड्यात २६५ दात्यांनी केले रक्तदान

परंड्यात २६५ दात्यांनी केले रक्तदान

googlenewsNext

(फोटो : विजय माने ३०)

परंडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंडा पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात २६५ जणांनी रक्तदान करून कोरोनालढ्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यात दहा महिलांचा देखील समावेश आहे. यावेळी सहभागी रक्तदात्यांना पोलीस प्रशासनाकडून प्रत्येकी एक हेल्मेट भेट देण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी केले. यावेळी सपोनि आय. एम. मोमीन, पोकॉ आजित कवडे, पोना किरण हावळे, पोना रामराजे शिंदे, पोकॉ नीलेश खरात, महिला पोलीस शबाना मुल्ला, बुद्धीवान लटके, समाजसेवक शरिफ तांबोळी, बालाजी नेटके, बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश गणगे आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये तरुण, तरुणीसह ५० वर्षांपर्यंतच्या नागरिकांनी रक्तदान केले. शिबिरासाठी पोकॉ, अजित कवडे, मनोज परंडेकर, भगवंत रक्तपेढीचे गणेश जगदाळे, अमोल नवले, विजय तोडकरी, प्राजक्ता क्षीरसागर, आकांक्षा कदम, शबाना शेख यांनी पुढाकार घेतला.

चौकट....

स्वागत कक्षासाठी दहा लाखांचा निधी

परंडा पोलीस प्रशासनाच्या महारक्तदान शिबिर आयोजनाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी भ्रमणध्वनीद्वारे कौतुक केले तसेच शिबिराचे औचित्य साधून पोलीस ठाणे अंतर्गत अभ्यंगत स्वागत कक्षाच्या इमारतीसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून १० लक्ष रुपयांच्या निधीचीही घोषणा केली. या स्वागत कक्षांच्या उभारणीचे काम तत्काळ हाती घेण्यात येणार असल्याचे प्रा. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Blood donation was made by 265 donors in Paranda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.