जिल्ह्याची सीमा पारगावनजीक सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:31 AM2021-05-14T04:31:58+5:302021-05-14T04:31:58+5:30
पारगाव : लाॅकडाऊन असतानाही बीड जिल्ह्यातील वाहने बिनदिक्कतपणे उस्मानाबाद जिल्ह्यात येत हाेती. बहुतांश वाहने विनापास धावत हाेती. ही बाब ...
पारगाव : लाॅकडाऊन असतानाही बीड जिल्ह्यातील वाहने बिनदिक्कतपणे उस्मानाबाद जिल्ह्यात येत हाेती. बहुतांश वाहने विनापास धावत हाेती. ही बाब ‘लाेकमत’ने समाेर आणल्यानंतर जिल्हा सीमेवरील पारगावनजीक पाेलीस नाका सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता विनापास धावणाऱ्या वाहनांना अटकाव हाेणार आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने तीव्र स्वरूप धारण केले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढता धाेका लक्षात घेऊन शासनाने जिल्हाबंदी लागू केली आहे. पास असल्याशिवाय वाहनांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे. दरम्यान, शासनाचे आदेश येताच बीड जिल्हा पाेलीस प्रशासनाने पारगाव-चाैसाळा जिल्हा सीमेवर पहिल्या दिवशीपासूनच बीड हद्दीत प्रवेश करणाऱ्या वाहनांची चाैकशी करीत हाेते. असे असतानाच दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर वाशी पाेलिसांनी तपासणी नाका न करता ते पारगापासून दक्षिणेकडे ५ किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव (क.) पाटी येथील टाेलनक्यावर तपासणी नाका उभारला होता. परिणामी बीड जिल्ह्यातील वाहनांना पास नसतानाही उस्मानाबादेत बिनदिक्कतपणे प्रवेश मिळत हाेता. जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर ही वाहने चाेर मार्गांनी इच्छितस्थळी जात हाेती. ही बाब ‘लाेकमत’ने समाेर आणली हाेती. याची दखल घेत वाशी पाेलीस ठाण्याने टाेलनाक्यावर असणारा तपासणी नाका तत्काळ हलविला. हा तपासणी नाका बीड-उस्मानाबादच्या सरहद्दीवर म्हणजेच पारगाव येथे सुरू केला आहे. त्यामुळे आता बीडमधून विनापास उस्मानाबादच्या हद्दीत दाखल हाेणाऱ्या वाहनांना अटकाव हाेणार आहे.