बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली आठ हजारांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:33+5:302021-06-09T04:40:33+5:30
उमरगा तालुक्यातील तक्रारदार यांची बियर शॉपी आहे. त्यांना या आस्थापनेच्या परवान्याचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. या कामासाठी शासकीय ...
उमरगा तालुक्यातील तक्रारदार यांची बियर शॉपी आहे. त्यांना या आस्थापनेच्या परवान्याचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. या कामासाठी शासकीय चलन भरून परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुय्यम निरीक्षक सुमित सुधाकर फावडे (३१) व जवान श्याम किशोर राऊत (३३) यांच्याकडे तक्रारदाराने संपर्क केला होता. तेव्हा दोन्ही आरोपींनी त्यांच्याकडे आठ हजार रुपये ला. देण्याची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराने सर्व प्रशासकीय पूर्तता करून लाचेसंदर्भात लाचुलचपत प्रतिबंधित विभागाकडे तक्रार केली. उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी ला. मागितल्याची खात्री केल्यानंतर निरीक्षक गौरीशंकर पाबळे, कर्मचारी शिवाजी सर्जे, मधुकर जाधव, विष्णु बेळे, विशाल डोके, दत्तात्रय करडे यांच्या पथकास कारवाईची सूचना केली. या पथकाने सोमवारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने लाचेची रक्कम आरोपींकडे सुपूर्द करताच पथकाने या दोघांना रंगेहात पकडले. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.