ग्रामस्थांच्या दुजाभावाने व्यथित कानेगावातील बौध्द बाधवांची घरत्याग यात्रा, ४४ किमीची पायपीट

By सूरज पाचपिंडे  | Published: April 10, 2023 07:39 PM2023-04-10T19:39:42+5:302023-04-10T19:40:57+5:30

आज ४४ किलोमीटर पायपीट करुन ग्रामस्थांचा मोर्चा जिल्हाकचेरीवर धडकला.

Buddhist families of Kanegaon, suffering from the villagers, went on a pilgrimage of 44 km | ग्रामस्थांच्या दुजाभावाने व्यथित कानेगावातील बौध्द बाधवांची घरत्याग यात्रा, ४४ किमीची पायपीट

ग्रामस्थांच्या दुजाभावाने व्यथित कानेगावातील बौध्द बाधवांची घरत्याग यात्रा, ४४ किमीची पायपीट

googlenewsNext

धाराशिव : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून बौध्द समाजातील नागरिकांना दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोप करीत कानेगाव येथील १०० वर ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाकचेरीवर मार्चा काढला. यावेळी जिल्हा प्रशासनासह शासनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे मागील काही वर्षांपासून दोन समाजामध्ये समाज मंदिराच्या कारणावरून वाद सुरु आहे. ग्रामंपचायतीने समाज मंदिरात ग्रामपंचायत स्थलांतरीत करण्याचा ठराव घेतला. तसेच मंदिर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले. भीम जयंतीपूर्वी समाजमंदिर बौध्द बांधवासांठी खुले करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतकडे केली असता, मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे कानेगाव येथील शेकडो ग्रामस्थांनी हाती निळा ध्वज, बाबासाहेबांचा फोटो घेऊन जिल्हाकचेरीकडे मोर्चा वळविला. 

सोमवारी ४४ किलोमीटर पायपीट करुन ग्रामस्थांचा मोर्चा जिल्हाकचेरीवर धडकला. यावेळी ग्रामस्थांनी कानेगावचे समाज मंदिर खुले करुन देण्यात यावे, तरुणांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

Web Title: Buddhist families of Kanegaon, suffering from the villagers, went on a pilgrimage of 44 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.