उस्मानाबादेत पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
By सूरज पाचपिंडे | Published: September 15, 2022 05:34 PM2022-09-15T17:34:17+5:302022-09-15T17:37:14+5:30
शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे निदर्शने, पोलीस दलातून बडतर्फ करण्याची मागणी
उस्मानाबाद : जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी मराठा समाजाविषयी आक्षपार्ह विधान केल्याने राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. गुरुवारी उस्मानाबाद शहरात शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निदर्शने केली.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत पोलीस निरीक्षक किरण बकाले यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक किरण बकाले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर मोबाईलवर बोलत असताना मराठा समाजाबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केले आहे.
बकाले सारखे अधिकारी जर पोलीस खात्यात राहिले तर समाजात अशांतता निर्माण होऊन समाजात अशांतता निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोलीस निरीक्षक बकाले यांना बडतर्फ करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. आंदोलनात यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष शशिकांत खुने, उपाध्यक्ष धर्मराज सुर्यवंशी, सचिव दत्तात्रय साळुंके, कार्याध्यक्ष रवी मुंडे, सदानंद दहिटणकर, कंचेश्वर डोंगरे, संघटन अमोल पवार, अच्युत थोरात, कायदे सल्लागार ॲड. प्रशांत जगदाळे, सुनील मिसाळ, विकास जाधव, गणेश नलावडे, आनंद जाधव, रियाज शेख, धनंजय साळुंके, अशोक गुरव, संतोष घोरपडे, मच्छिंद्र कांबळे, दत्ता जावळे, नितीन वीर, मनोज शेलार, शीलाताई जोशी, किरण गायकवाड, वर्षा आतकरे आदी पदाधिकारी सहभागी होते.