२७९३ शाळा, अंगणवाडीतील बालकांच्या बॅगमधील पाण्याच्या बाटलीस ‘बाय-बाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:09 AM2021-09-02T05:09:28+5:302021-09-02T05:09:28+5:30

अंगणवाडी तसेच शाळांतील मुलांच्या अशुद्ध पाणी पिण्यात आल्यास डायरीयासारखे आजार उद्भवू शकतात. अशी बालके कुपाेषणाच्या विळख्यात सापडण्याची दाट शक्यता ...

'Bye-bye' for water bottles in children's bags at 2793 schools, Anganwadi | २७९३ शाळा, अंगणवाडीतील बालकांच्या बॅगमधील पाण्याच्या बाटलीस ‘बाय-बाय’

२७९३ शाळा, अंगणवाडीतील बालकांच्या बॅगमधील पाण्याच्या बाटलीस ‘बाय-बाय’

googlenewsNext

अंगणवाडी तसेच शाळांतील मुलांच्या अशुद्ध पाणी पिण्यात आल्यास डायरीयासारखे आजार उद्भवू शकतात. अशी बालके कुपाेषणाच्या विळख्यात सापडण्याची दाट शक्यता असते. असे काही प्रकारही समाेर आल्यानंतर शासनाने शाळा, अंगणवाडी तिथे नळजाेडणी देण्याचा निर्णय घेतला हाेता. यासाठी जल जीवन मिशन सुरू करण्यात आले. या माध्यमातून सुमारे १ हजार ५६९ शाळा व १ हजार ८६० अंगणवाड्यांना स्वतंत्र नळजाेडणी देण्याचे उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले हाेते. याकरिता १५ व्या वित्त आयाेगातून निधीची तरतूद करण्यात आली. ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश हाेते. मात्र, याेजनेला अपेक्षित गती मिळत नव्हती. ८ ऑगस्ट अखेर केवळ १ हजार ८७ नळ जाेडण्या देण्यात आल्या हाेत्या. आढाव्यातून ही बाब समाेर आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी ‘ऑनलाईन’चा आधार घेत एक ते दाेन दिवसाआड बैठक सुरू केल्या. प्रत्येक तालुक्याचा आढावा घेण्यात येत असल्याचे तालुकास्तरीय यंत्रणेच्या लक्षात आल्यानंतर गावपातळीपर्यंतचे कर्मचारी ‘ॲक्टिव्ह’ झाले. आणि अवघ्या २१ दिवसांत नळजाेडणी दिलेल्या अंगणवाडी, शाळांची संख्या १ हजार ७०५ ने वाढून थेट २ हजार ७८३ वर जावून ठेपली. आजघडीला अवघ्या ६१६ नळजाेडणी बाकी आहेत. त्याही अवघ्या काही दिवसांत पूर्ण केल्या जातील, असा दावा जल जीवन मिशनकडून करण्यात आला.

काेट....

जल जीवन मिशनच्या माध्यमातून शाळा, अंगणवाडीतील मुलांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी स्वतंत्र नळजाेडणी देण्यात येत आहे. या कामाचा मी ऑनलाईन पद्धतीने नियमित आढावा घेत आहे. त्यामुळे गावपातळीपर्यंतची यंत्रणा ॲक्टिव्ह झाली आहे. त्यामुळे अवघ्या २१ दिवसांत नळजाेडणीची संख्या १ हजार ८७ वरून थेट २ हजार ७९३ वर पाेहाेचली आहे. जिल्हा तसेच तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचार्यांचे यात माेठे याेगदान आहे. उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करू.

-राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

८ हजार कुटुंबांना वैयक्तिक नळजाेडणी

शाळा, अंगणवाडीसाेबतच ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे नळकनेक्शन नाही, त्यांनाही जल जीवन मिशनकडून नळजाेडणी दिली जात आहे. ९० हजार १३ कुटुंबांचे उद्दिष्ट आहे. आजवर ८ हजार ४२९ कुटुंबांना नळ कनेक्शन देऊन झाले आहे.

दृष्टिक्षेपात नळजाेडणी

घटक उद्दिष्ट सध्य

कुटुंबे ९००१३ ८४२९

शाळा १५४९ १४८७

अंगणवाडी १८६० १३०६

Web Title: 'Bye-bye' for water bottles in children's bags at 2793 schools, Anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.