३१ लाख रुपयांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:37+5:302021-07-16T04:23:37+5:30
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर शहरातून मिनीटेम्पोमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती तुळजापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी गाडीचा पाठलाग करून ...
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर शहरातून मिनीटेम्पोमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती तुळजापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी गाडीचा पाठलाग करून येरमाळा येथून वाहन ताब्यात घेतले. यात ३१ लाख रुपये किमतीचा १५६ किलो गांजा आढळून आला आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जप्त करून आठ जणांना ताब्यात घेतली आहे. ही कारवाई बुधवार दि. १४ जुलै रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास केली असून, तुळजापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात महिलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जालना येथील चार पुरुष व चार महिला बुधवारी हैदराबाद येथून ट्रकमधून तुळजापूर येथे आले होते. येथील बसस्थानकात उतरून त्यांनी तुळजापूर येथील एक मिनी टेम्पो (एमएच २५ एजे ३२०१) हा भाड्याने घेतला. हे वाहन जालन्याकडे जात असल्याची माहिती तुळजापूर पोलिसांना मिळाली, यानंतर पोलिसांनी पाठलाग करून येरमाळा येथे हे वाहन थांबविले. यातील चार महिला व चार पुरुष यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात असलेली ७ गाठोडी व एका बॅगमधील गांजा ताब्यात घेतला आहे. गुरुवारी त्याची मोजणी केली असता तो १५६ किलोग्रॅम भरला. या गांजाची बाजारभावानुसार किंमत ३१ लाख रुपये असल्याचे तुळजापूर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद, कर्मचारी महेश सावरे, बी.एस. मंडोळे, सहायक फौजदार शिंदे यांनी केली.
150721\20210715_162446.jpg~150721\20210715_162448.jpg
छोटा हत्ती मधील गांजा उतरताना पोलीस कर्मचारी~छोटा हत्ती मधील गांजा उतरताना पोलीस कर्मचारी