उसाच्या ट्रेलरला कारची धडक, तरुण गतप्राण

By चेतनकुमार धनुरे | Published: March 11, 2023 06:59 PM2023-03-11T18:59:04+5:302023-03-11T18:59:29+5:30

ढोकी गावानजीकच्या एका हॉटेलजवळ येताच समोरील उसाने भरलेल्या ट्रेलरला कारची जोराची धडक बसली.

Car collides with sugarcane trailer, youth dies | उसाच्या ट्रेलरला कारची धडक, तरुण गतप्राण

उसाच्या ट्रेलरला कारची धडक, तरुण गतप्राण

googlenewsNext

ढोकी (जि. धाराशिव) : येथील कळंब रोडवर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. उसाने भरलेल्या ट्रेलरला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात कळ॔ंब तालुक्यातील माळकरंजा येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कळ॔ंब तालुक्यातील माळकरंजा येथील संतोष सुरेश तुपसौंदर्य (३५) हा तरुण शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त गावातून ढोकीकडे निघाला होता. आपल्या कारने तो एकटाच निघाला होता. दरम्यान, ढोकी गावानजीकच्या एका हॉटेलजवळ येताच समोरील उसाने भरलेल्या ट्रेलरला त्याच्या कारची जोराची धडक बसली. या घटनेत संतोषचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचा दरवाजा तोडून संतोषचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला सारुन पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. मृत संतोषचे ढोकी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता संतोषच्या पार्थिवावर माळकरंजा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.
एकुलता आधार गेला...

संतोष तुपसौंदर्य हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. संतोषच्या एकुलत्या बहिणीचाही काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकुलता आधार असलेल्या संतोषचा ही अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडिलांचा आधारच हरपला आहे.

Web Title: Car collides with sugarcane trailer, youth dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.