केशेगावात १७३ जणांना दिली काेराेनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:32 AM2021-05-14T04:32:00+5:302021-05-14T04:32:00+5:30
काेराेनाचा संसर्ग वाढू लागल्याने लाेकांचा लस घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बहुतांश सेंटरवर गर्दी हाेत आहे. बुधवारी केशेगाव येथील ...
काेराेनाचा संसर्ग वाढू लागल्याने लाेकांचा लस घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बहुतांश सेंटरवर गर्दी हाेत आहे. बुधवारी केशेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण ठेवण्यात आले हाेते. या ठिकाणी लसीकरणासाठी केशेगावसह सराटी, बाभळगाव, निलेगाव येथील ग्रामस्थ उपस्थित झाले हाेते. त्यामुळे एखाद्या निवडणुकीतील मतदान केंद्राचे स्वरूप या लसीकरण सेंटरला आले हाेते. दिवसभरात जवळपास १७३ जणांनी लस टाेचून घेतले. अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवलिंग शेटे, डॉ. जगदीश शिंदे, सरपंच रेश्मा घंटे, उपसरपंच जाकीर शेख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप हुकिरे, ग्रा.पं. सदस्य चन्नाप्पा साखरे, मुख्याध्यापक भीमाशंकर घंटे, पोलीस पाटील कमलबाई स्वामी, आरोग्य पर्यवेक्षक धोंडिबा कदम, गणेश कांबळे, सचिन बागडे, दयानंद जळकोटे, परिचारिका मृणालिनी कांबळे, आशा कार्यकर्ती शीतल हुकिरे, संतोषी कांबळे आदींनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.