महिला रूग्णाच्या विनयभंग प्रकरणी लोहाऱ्यात डॉक्टराविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:31 IST2018-08-28T18:23:41+5:302018-08-28T18:31:57+5:30
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉक्टराविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

महिला रूग्णाच्या विनयभंग प्रकरणी लोहाऱ्यात डॉक्टराविरूध्द गुन्हा
लोहारा (उस्मानाबाद ) : हात दुखत असल्याने तपासणीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉक्टराविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना लोहारा शहरातील कानेगाव रोडवरील दवाखान्यात सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली़
लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील एका २७ वर्षीय महिलेचा हात दुखत होता़ त्यामुळे ती महिला सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास लोहारा शहरातील कानेगाव मार्गावरील दवाखान्यात उपचारासाठी गेली होती़ मात्र, तपासणी करीत असताना डॉ़ रामकृष्ण घायाळ यांनी विनयभंग केल्याची फिर्याद पीडित महिलेने लोहारा पोलीस ठाण्यात दिली़ पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री डॉ़ रामकृष्ण घायाळ यांच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक बी.एस.क़ाजळे करीत आहेत़