काेविशिल्डचे अडीच हजारांवर डाेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:34 AM2021-05-21T04:34:39+5:302021-05-21T04:34:39+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिक तसेच आराेग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर यांना २१ मे राेजी काेविशिल्ड लसीचा पहिला ...

Cavshield's two and a half thousand das | काेविशिल्डचे अडीच हजारांवर डाेस

काेविशिल्डचे अडीच हजारांवर डाेस

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिक तसेच आराेग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर यांना २१ मे राेजी काेविशिल्ड लसीचा पहिला डाेस देण्यात येणार आहे. यासाठी ४९ लसीकरण केंद्रे निर्माण करण्यात आली असून २ हजार ५२० डाेस उपलब्ध झाले असल्याचे आराेग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

काेराेना लसीकरणासाठी अनेकांनी नाेंदणी केली आहे. परंतु, पुरेशी लस उपलब्ध हाेत नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, आराेग्य विभागाला काेविशिल्ड लसीचे डाेस उपलब्ध हाेताच लसीकरणासाठी जिल्हाभरात सुमारे ४९ सेंटर निर्माण करण्यात आले आहेत. यात ३६ आराेग्य उपकेंद्रे, एक नागरी प्राथमिक आराेग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व पाेलीस रुग्णालयाचा समावेश आहे. येथे २१ मे राेजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण माेहीम चालणार आहे. लसीकरणासाठी ऑन द स्पाॅट नाेंदणीनंतर अनुक्रमे लस दिली जाणार आहे. यासाठी लसीचे २ हजार ५२० डाेस उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.

चाैकट...

काेविशिल्डचा पहिला डाेस येथे मिळणार...

आराेग्य उपकेंद्र - खामगाव, शिंगाेली, कामेगाव, दारफळ, बामणी, चिलवडी, घाटंग्री, खुदावाडी, माळुंब्रा, मसला खुर्द, खडकी, तीर्थ खुर्द, देवसिंगा तुळ, मळगी, डाळिंब, जकेकूर, एकुर्गा, भातागळी, हिप्परगा रवा, धानाेरी, ताेरंबा, पिंपरी (शि.), जायफळ, गाैरगाव, देवळाली, वाकडी, हासेगाव, गाेजवाडा, कडकनाथवाडी, घाटपिंपरी, दुधडी, ईडा, चिंचपूर बु., कुक्कडगाव, पिस्तमवाडी येथे प्रत्येकी १५० डाेस उपलब्ध करून दिले आहेत.

ग्रामीण रुग्णालय मुरूम ११०, लाेहारा १५०, सास्तूर १५०, तेर १४०, वाशी १००, भूम १३०. उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर १००, कळंब १९०, परंडा २७०. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय २४०, जिल्हा रुग्णालय ४००, नागरी प्राथमिक आराेग्य केंद्र १३०, पाेलीस रुग्णालय (केवळ फ्रंटलाइन वर्कर) २६० डाेस उपलब्ध करण्यात आले आहेत.

येथे मिळणार काेव्हॅक्सिनचा दुसरा डाेस...

जिल्ह्यासाठी काेव्हॅक्सिनचे साेळाशेवर डाेस उपलब्ध झाले आहेत. यासाठी सात लसीकरण केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. ज्यांनी पहिला डाेस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना दुसरा डाेस दिला जाणार आहे. उस्मानाबाद शहरातील वैराग राेडवरील नागरी प्राथमिक आराेग्य केंद्रावर (केवळ फ्रंटलाइन वर्कर) ३०० डाेस, ग्रामीण रुग्णालय भूम ३६०, वाशी ३२०, तेर १९०, मुरूम १५०, लाेहारा १५० आणि सास्तूर येथे १३० डाेस उपलब्ध असतील.

Web Title: Cavshield's two and a half thousand das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.