पुस्तकांचे वाटप करून बुद्ध पौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:33 AM2021-05-27T04:33:38+5:302021-05-27T04:33:38+5:30
बुद्ध धम्मामध्ये मे महिन्यातील वैशाखी पौर्णिमेला म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला खूपच महत्त्व आहे. कारण तथागथ बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण ...
बुद्ध धम्मामध्ये मे महिन्यातील वैशाखी पौर्णिमेला म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला खूपच महत्त्व आहे. कारण तथागथ बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण याच वैशाखी पौर्णिमेला झाले होते. जेतवन कॉलनीत यानिमित्त सकाळी पंचशील ध्वजाचे अनावरण करण्यात आले. यानंतर महिलांनी बुद्ध वंदना सादर केली. सध्या लाॅकडाऊन असल्याने नागरिक घरातच आहेत. यामुळे त्यांच्यात वाचन संस्कृती वाढावी व बुद्धांचे सुसंस्कारित विचार घराघरात पोहचावे यासाठी प्रा. राजा जगताप लिखित ‘गाव तेथे बुद्ध विहार’ या पुस्तकांचे यानिमित्ताने मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रिपाइंचे जिल्हा सचिव दादा शिंगाडे, कुमार कांबळे, टिल्लू वाघमारे, बाबासाहेब मस्के, मारुती पवार, बाळासाहेब माने, प्रा. राजा जगताप, प्रा.दादा चंदनशिवे, प्रमोद चंदनशिवे, रमाकांत गायकवाड यांनी केले होते. यावेळी प्रा. महेंद्र चंदनशिवे, मालोजी वाघमारे, ओहाळ, भारत शिंदे, संपत शिंदे, सुधीर गायकवाड, सुबोध शिंगाडे, प्रर्वतन जगताप, सुजित वाव्हळकर, सुमित चंदनशिवे आदी उपस्धित होते. बुध्द पूजा पाठ सादर करण्याचे कार्य पवार, शिंदे, जगताप यांनी केले.