मासिक पाळी स्वच्छता आठवडा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:15+5:302021-06-05T04:24:15+5:30
राज्य शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी काढलेल्या पत्रानुसार २८ मे ते ५ ...
राज्य शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी काढलेल्या पत्रानुसार २८ मे ते ५ जून हा आठवडा मासिक पाळी स्वच्छता आठवडा म्हणून साजरा करण्यात आला. या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच घोष वाक्य, चित्रकला आदी स्पर्धाही झाल्या. चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सायली जाधव, द्वितीय भाग्यश्री राठोड, तृतीय सुप्रिया जाधव हिने पटकावला. तर जयश्री राठोड, मेघा सिरसे, श्रेया शिंदे, स्वाती चव्हाण, रूपाली शिंदे आदींनी स्पर्धेमध्ये भाग घेतला. निबंध स्पर्धेत मल्लिकार्जुन कलशेट्टी तर घोषवाक्य स्पर्धेमध्ये सुनंदा निर्मले यांनी सहभाग नाेंदविला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, अनंत कानेगावकर, मोरवे खिजर, कलशेट्टी मल्लिकार्जुन आदींनी परिश्रम घेतले.