चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:31 AM2021-03-21T04:31:22+5:302021-03-21T04:31:22+5:30
तुळजापूर : येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहर शाखा तुळजापूरच्या वतीने चवदार तळे सत्याग्रहाचा ९४वा वर्धापन ...
तुळजापूर : येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शहर शाखा तुळजापूरच्या वतीने चवदार तळे सत्याग्रहाचा ९४वा वर्धापन दिन तुळजापूर येथे साजरा करण्यात आला.
प्रारंभी तुळजापूर येथील क्रांती चौकात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला शहराध्यक्ष अरुण कदम, युवा शहराध्यक्ष अमोल कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी रिपाइं जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, शहराध्यक्ष अरुण कदम, अमोल कदम, तानाजी दाजी कदम, संजय कदम, राजपाल कदम, महादेव सोनवणे, तानाजी डावरे, कुमार चौधरी, पृथ्वीराज कदम, दशरथ सावंत, अतिश कदम, बालाजी कदम, राम सोनवणे, छोटू सोनवणे, विष्णू गायकवाड, बापू भालेकर, सुशील कदम, पप्पू सिद्धगणेश, दीपक कदम, शंकर हावळेसह आदी उपस्थित हाेते.