केंद्र सरकारने आता तातडीने मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:27 AM2020-12-23T04:27:52+5:302020-12-23T04:27:52+5:30

उस्मानाबाद - केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ ...

The central government should help immediately | केंद्र सरकारने आता तातडीने मदत करावी

केंद्र सरकारने आता तातडीने मदत करावी

googlenewsNext

उस्मानाबाद - केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ भरीव मदत करावी, अशी अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. भेटीदरम्यान त्यानी आलेल्या अधिकाऱ्यांसमाेर वस्तुस्थिती मांडून नुकसानीची माहिती दिली.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. मुळातच पथक उशिरा आल्याने ही परिस्थिती दाखविता येणार नसल्याचे मतही आमदार कैलास पाटील यानी व्यक्त केले. ‘बैल गेला अन् झोपा केला’ या म्हणीप्रमाणे केंद्राची कार्यपध्दती असल्याने किमान आता आल्यानंतर तरी वस्तुनिष्ट अहवाल द्यावा, मागणी आमदार पाटील यानी यावेळी केली. बहुभुधारक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या ओहत. परंतु, केंद्राच्या जाचक अटीमुळे अशा शेतकर्यांना मदत मिळालेली नाही. हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. याबाबतीत केंद्र सरकारने काहीतरी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. या मदतीला दिरंगाई झाल्यास त्यांना पुढील हंगामात पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे या प्रश्नाकडे अधिक सहानुभुतीने पाहण्याची गरज असल्याचेही आमदार पाटील यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले असून केंद्राकडून अधिक अपेक्षा असतात. मात्र तिथेच दिरंगाई झाल्याने शेतकऱ्यांतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

चाैकट...

विमा कंपन्यानी व्ययक्तीक पंचनामा ग्राह्य धरुन त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई द्यावी. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पंचनामा करणे शक्य झालेले नाही, त्यांच्यासाठी महसूल विभागाकडून करण्यात आलेले पंचनामेही ग्राह्य धरल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणे अधिक सोयीचे होईल. विमा कंपन्याना त्या प्रकारचे आदेश दिले तर शेतकऱ्यांना त्याचाही फायदा होईल असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The central government should help immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.