तेरखेडा कोरोना सेंटरला सीईओंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:56+5:302021-06-04T04:24:56+5:30
पेठसांगवी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती पेठसांगवी : येथील ग्रामपंचायत कार्यालय व खंडोबा मंदिरात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. ...
पेठसांगवी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती
पेठसांगवी : येथील ग्रामपंचायत कार्यालय व खंडोबा मंदिरात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण सरपंच सुमनताई सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य बसवराज शिंदे, उपसरपंच सिराज शेख, गणेश पाटील, प्रकाश सुभेदार, राजेंद्र पाटील, सदानंद बिराजदार, ग्रामसेवक जी. एम. कासार, तलाठी एन. पी. बेंबळीकर, संजय माळी, पोलीस पाटील ईश्वर सुरवसे, अमोल सुभेदार, ज्ञानेश्वर शिंदे, तुकाराम सुभेदार, नागनाथ यमगर, रुपालीताई सुभेदार, मनीषा सुभेदार, मिलिंद सुरवसे, शब्बीर मुजावर, निळकंठ राठोड, गिरमल दलाल आदी उपस्थित होते. यावेळी आशा व अंगणवाडी कार्यकर्ती यांचा रुपालीताई सुभेदार यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन तुकाराम सुभेदार यांनी तर आभार हणमंत शिंदे यांनी मानले.
आरोग्य उपकेंद्राची इमारत धूळखात
रांजणी : कळंब तालुक्यातील रांजणी येथे जवळपास एक कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत उभारण्यात आली. इमारतीचे काम पूर्ण होऊन एक वर्ष होत आले तरी येथे अद्याप कर्मचारी नियुक्त झाले नसल्याने प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ होऊ शकला नाही. परिणामी ही इमारत वापराविना धूळ खात पडून आहे.
गावात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळे रांजणी येथील ग्रामस्थांना उपचार घेण्यासाठी शिराढोण, तांदुळजा याठिकाणी जावे लागत आहे. हे उपकेंद्र सुरू झाल्यास जवळपास चार हजार लोकसंख्या असलेल्या रांजणी गावाला गावातच प्रथमोपचार मिळणार आहेत. एकीकडे कोरोनाचा उद्रेक वाढला असल्याने आरोग्य विभागास इमारती अपुऱ्या पडत आहेत तर दुसरीकडे सुसज्ज अशा इमारती वापराविना धूळखात पडून आहेत. त्यामुळे हे उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.