‘सीईटी’ रद्द, पदवी गुणांवरच प्रवेश...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:28 AM2020-12-23T04:28:05+5:302020-12-23T04:28:05+5:30
उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व १० विभागात ‘ऑनलाईन‘ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाची प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) रद्द ...
उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व १० विभागात ‘ऑनलाईन‘ प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाची प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पदवी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना २२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. २ जानेवारी रोजी प्राथमिक यादी तर ६ जानेवारी २०२१ रोजी प्रवेशित विद्यार्थ्यांची पहिली यादी प्रसिसद्ध हाेणार आहे. १८ जानेवारी रोजी दुसरी यादी तर २३ जानेवारी रोजी तृतीय यादी व स्पॉट अॅडमिशन देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका १८ जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागातील विषय, उपलब्ध प्रवेशित जागा, आरक्षण, शुल्क, पात्रता आदी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उपपरिसरचे संचालक डॉ.डी.के.गायकवाड यांनी दिली.