‘तेरणा’च्या गेटवर शेतकरी, कामगाांचेे आजपासून साखळी उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:20 AM2021-02-22T04:20:55+5:302021-02-22T04:20:55+5:30
कारखाना सुरू करण्याची मागणी -बँकेच्या निगराणीखाली कारखाना भाडेतत्त्वावर द्या ढाेकी (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील ढाेकी येथील तेरणा शेतकरी सहकारी ...
कारखाना सुरू करण्याची मागणी -बँकेच्या निगराणीखाली कारखाना भाडेतत्त्वावर द्या
ढाेकी (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील ढाेकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी झालेल्या जाेरदार पावसामुळे यंदा उसाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे तेरणा काखाना सुरू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी, कामगार, शेतमजुरांच्या वतीने ‘तेरणाा’च्या प्रवेशद्वारात साेमवारपासून साखळी उपाेषण केले जाणार आहे.
मराठवाड्यातील सहकार क्षेत्रातील ढाेकी येथील तेरणा हा पहिला सहकारी साखर कारखाना आहे. मागील तेरा वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. असे असले तरी कारखान्याची सर्व मशिनरी सुस्थितीत आहे. असे असतानाही काही राजकीय मंडळीने हा कारखाना चालूच होऊ शकत नाही, अशा स्वरूपाचा संभ्रम निर्माण केला जात आहे; परंतु वस्तुस्थिती तशी नसल्याचे तेरणा संघर्ष समितीचे म्हणणे आहे. समितीने एका कार्यकारी संंचालकाकडून कारखान्याचे ऑडिट करून घेतले असता, कारखाना सुरू करण्यासाठी अवघे दहा ते पंधरा काेटी रुपये आवश्यक आहेत, तर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे ९ काेटी, असे एकूण ३० काेटी आवश्यक आहेत. राज्य सरकारने थकहमीतून ही रक्कम उपलब्ध करून देऊन कारखाना सुरू करावा, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. या प्रमुख मागणीसाठी साेमवारपासून संघर्ष समितीच्या वतीने ‘तेरणा’च्या प्रवेशद्वारात साेमवारपासून साखळी उपाेषण सुरू केले जाणार आहे. या आंदाेलनाची सुरुवात ढाेकी गटापासून हाेणार आहे. सकाळी संपूर्ण गाव बंद ठेवून हनुमान मंदिर ते कारखाना गेटपर्यंत ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे. दरम्यान,२३ फेब्रुवारी रोजी तेर गट, २४ मोहा, खामसवाडी गट, २५ राेजी शिराढाेण, तर २६ राेजी उस्मानाबाद व परिसरातील शेतकरी सहभागी हाेणार आहेत. आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
चाैकट...
अन्य कारखान्यांप्रमाणे ‘तेरणा’ला न्याय द्या...
राज्य सरकारने जिल्ह्यातील वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखाना, तसेच भूम येथील बाणगंगा साखर कारखाना संचालक मंडळाच्या निगराणीखाली दीर्घकालीन मुदतीने भाडेतत्त्वावर दिले आहेत. याच धर्तीवर तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अवसायकांच्या देखरेखीखाली भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात यावा, अशी मागणी तेरणा संघर्ष समितीने केली आहे.