तुळजाभवानीच्या अभिषेक वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 04:54 AM2017-08-07T04:54:56+5:302017-08-07T04:54:56+5:30
चंद्रगहणामुळे सोमवारी श्री तुळजाभवानी मातेच्या नियमित अभिषेक वेळेत बदल करण्यात आले आहेत. देवीच्या विविध धार्मिक विधीसाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. त्यामुळे भाविकांना चोवीस तास देवीचे दर्शन घेता येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळजापूर : चंद्रगहणामुळे सोमवारी श्री तुळजाभवानी मातेच्या नियमित अभिषेक वेळेत बदल करण्यात आले आहेत. देवीच्या विविध धार्मिक विधीसाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. त्यामुळे भाविकांना चोवीस तास देवीचे दर्शन घेता येईल.
सोमवारी सकाळी नियमितपणे तुळजाभवानीचे पूजाविधी पार पडल्यानंतर सायंकाळची अभिषेक पूजा सातऐवजी सहा वाजता सुरू होईल. त्यानंतर आरती, अंगारा, धुपारती हे विधी तर, छबिना व प्रक्षाळपूजा रात्री दहाऐवजी साडेआठ वाजता सुरू होऊन नऊ वाजेपर्यंत चालणार आहे. पहाटे चार वाजता होणारे चरणतीर्थही रात्री दहा वाजता होणार असून, रात्री साडेदहा वाजता अभिषेक घाट होवून पंचामृत अभिषेक होईल. चंद्रग्रहण संपल्यानंतर म्हणजेच रात्री एक वाजता देवीस पंचामृत व शुद्ध स्नान तसेच आरती, अंगारा, धुपारती हे विधी पार पडणार आहेत. यानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे, असे मंदिर संस्थानतर्फे सांगण्यात आले.