तुळजाभवानी देवीच्या दर्शन वेळेत ३० आॅक्टोबरपासून बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 06:43 PM2018-10-29T18:43:35+5:302018-10-29T18:44:32+5:30
आगामी दिवाळी व ख्रिसमस या सणांचा विचार करून भाविकांची वाढती गर्दी पाहता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनने ३० आॅक्टोबर पासून दर्शन वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
तुळजापूर (उस्मानाबाद) : आगामी दिवाळी व ख्रिसमस या सणांचा विचार करून भाविकांची वाढती गर्दी पाहता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनने ३० आॅक्टोबर पासून दर्शन वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मंगळवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमा या गर्दीच्या दिवशी देवीचे चरणतीर्थ रात्री १ वाजता होऊन चरणतीर्थानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. तसेच अभिषेक पूजेची घाट सकाळी ६ वाजता होऊन अभिषेक १० वाजता संपणार आहेत. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत अभिषेक होतील. इतर दिवशी चरणतीर्थ नियमितपणे पहाटे ४ वाजता होईल. हा बदल ३० आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीपर्यंत करण्यात आला असल्याची माहिती मंदिर संस्थानचे व्यवस्थापकीय तहसीलदार योगिता कोल्हे यांनी दिली.