म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसल्यास तपासणी करा : धनंजय पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:54+5:302021-06-11T04:22:54+5:30
डॉ. राम लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० ते १६ जून २०२१ या कालावधीत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दृष्टिदान दिन ...
डॉ. राम लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० ते १६ जून २०२१ या कालावधीत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दृष्टिदान दिन सप्ताहाचे उद्घाटनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन देशमुख, डॉ. ईस्माईल मुल्ला, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. एम. के. पल्ला, डॉ. महेश पाटील, डॉ. विरभद्र कोटलवाड, डॉ. ज्योती कानडे, डॉ. ए. बी. गोसावी, डॉ. सुधीर सोनटक्के, डॉ. प्रवीण डुमणे, डॉ. संजय सोनटक्के, डॉ. सचिन गायकवाड, अधिसेविका सुमित्रा गोरे, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे, शेख अयुब, रेणुका भावसार,नेत्रविभागाचे वॉर्ड इन्चार्ज शेख रौफ, नेत्रविभागातील अधिपरिचारिका कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, सहा महिन्यांतून एकदा डोळ्याची तपासणी करणे, रक्तदाबाप्रमाणे डोळ्यातील दाबाचे प्रमाण तपासणे, कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी डोळ्याची काळजी घ्यावी, असे डॉ. पाटील म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्र शल्यचिकित्सक डॉ. महेश पाटील म्हणाले, डॉ. भालचंद्र यांनी सामाजिक भावनेतून आणि कोणतीही सुविधा नसताना अंधत्व निर्मूलनाचे कार्य करून हजारो लोकांना दृष्टी दिली. मरणोत्तर नेत्रदानाबाबत माहिती देऊन सर्वांना नेत्रदानाचे संमतिपत्र भरून देण्याबाबत आवाहन केले. यावेळी अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, वॉर्ड इन्चार्ज, अधिपरिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अयुब शेख यांनी केले, तर आभार डॉ. देशमुख यांनी मानले.