छत्रपतींचा आदर्श प्रेरणादायी - अस्मिता कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:34 AM2021-02-20T05:34:05+5:302021-02-20T05:34:05+5:30
फाेटाे आहे... उस्मानाबाद : छत्रपती शिवरायांचा आदर्श जगासमोर प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले. ...
फाेटाे आहे...
उस्मानाबाद : छत्रपती शिवरायांचा आदर्श जगासमोर प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
रयतेचा राजा, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी केली जाते. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून प्रतिबंधक उपाय योजना केले जात असल्याने, सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. त्यांचा आदर्श संपूर्ण जगासमोर प्रेरणादायी असल्याचे मत अध्यक्षा कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, शिक्षणाधिकारी (माध्य.) गजानन सुसर, सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ सहायक प्रशासन अधिकारी बी. आर. हजारे, वरिष्ठ सहायक एफ.एस. पटेल, वरिष्ठ सहायक(भांडार विभाग) मधुकर कांबळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी डी.एस. देशपांडे, विस्तार अधिकारी सचिन देवगिरे आदी उपस्थित हाेते.
शिवसेनेच्या वतीने शिवपूजन (फाेटाे आहे)
कळंब - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण हुलजुते, नगरसेवक अनंत वाघमारे, सतीश टोणगे, प्रदीप मेटे, अतुल कवडे, डॉ.रूपेश कवडे, प्रा.संजय घुले, भागवत चोंदे, आकाश चोंदे, रुनवाल आदी उपस्थित हाेते.
पंचायत समिती उस्मानाबाद (फाेटाे आहे)
उस्मानाबाद - येथील पंचायत समितीमध्ये सभापती हेमा महेश चांदणे, उपसभापती आशिष नायकल, महेश चांदणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी सहायक प्रशासन अधिकारी एम.आर.माने, मिलिंद कांबळे, शाखा अभियंता एन.एस.पाटील, संतोष वाघमारे, कृषी अधिकारी दराडे, राऊत, राजेश स्वामी आदी उपस्थित हाेते.
गाेलाई चाैक, भूम (फाेटाे आहे)
भूम - येथील गोलाई चाैकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पालिकेतील गटनेते संजय गाढवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पाेलीस उपनिरीक्षक मंगेश साळवे सूरज गाढवे आदींची उपस्थिती हाेती.
छत्रपती शिवाजी महाराज चाैक, लाेहारा (फाेटाे आहे)
लोहारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोनि धरमसिंग चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी नागाण्णा वकील, शंकर जट्टे, मोहन पणुरे, चंद्रकांत पाटील, दिनकरराव जावळे, ॲड. दादासाहेब पाटील, हाजी बाबा शेख, अभिमान खराडे, गुंडू भुजबळ, नीळकंठ कांबळे, के.डी.पाटील, अमोल बिराजदार, विक्रांत संगशेट्टी, प्रमोद बंगले, दीपक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जगदिश लांडगे, बाळासाहेब पाटील, अविनाश माळी, नाना पाटील, दीपक रोडगे, नवाज सय्यद, श्रीकांत भरारे, सुनील वाले, ओम पाटील, प्रशांत काळे, हरी लोखंडे, प्रशांत लांडगे, दगडू तिगाडे आदी उपस्थित हाेते.
बहुजन विकास माेर्चा, कळंब (फाेटाे आहे)
कळंब - बहुजन विकास मोर्चा व राष्ट्रसंत गाडगे महाराज अनाथ आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कल्पनानगर येथे शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल, ‘एमआयएम’चे तालुकाध्यक्ष वाजेद काझी, अजय पारवे, अमर चाऊस, रोहन चव्हान, आळणे व संस्थेचे प्रमुख रवि शिंदे आदी उपस्थित हाेते.
शिवरायांच्या पुतळ्या दुग्धाभिषेक (फाेटाे आहे)
उमरगा - पालिका व विविध पक्ष, संघटना व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी आ.ज्ञानराज चौगुले, जि.प. विरोधी पक्षनेते शरण पाटील, किरण गायकवाड, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, बाबुराव शहापुरे, विजय वाघमारे, मराठा वाॅरियर्सचे सचिन शिंदे, विकास सूर्यवंशी, सुवर्णा भालेराव, नगरसेवक महेश माशाळकर, पंढरीनाथ कोणे, संजय पवार, संतोष सगर, अनिल सगर, व्यंकट पवार, दिगंबर औरादे, विक्रम मस्के, चंद्रशेखर पवार, अतिक मुन्शी, याकूब लदाफ आदी उपस्थित हाेते.
जिजामाता उद्यान चाैक, उस्मानाबाद (फाेटाे आहे)
उस्मानाबाद - शहरातील जिजामाता उद्यान चौकात मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवमूर्ती पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतापसिंह पाटील, मसूद शेख, सय्यद खलिल, प्रल्हाद मुंडे, नादेरउल्ला हुसेनी, विक्रम पाटील, अमरसिंह देशमुख, शाम नवले, प्रकाश जगताप, भारत कोकाटे, जयंत पाटील, बाळासाहेब शिंदे, आनंद जगताप, भालचंद्र कोकाटे, राम मुंडे, विशाल पाटील, योगेश सोन्ने, गजानन खर्चे, प्रसादराजे निंबाळकर, ऋषिकेश चपणे आदी उपस्थित हाेते.
ग्रामपंचायत कार्यालय, मस्सा (फाेटाे आहे)
मस्सा (खं) - येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रा.राजश्री धनंजय वरपे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी उपसरपंच विश्वनाथ तांदळे, तंटामुक्त अध्यक्ष विक्रम वरपे, सदस्य अक्षय माळी, नितीन सावंत, विष्णू बांगर, अजित वरपे, नंदकुमार घाडगे, अशोक थोरात, भैय्या शेळके, संभाजी चौघुले, बापुराव वरपे, बाळु वरपे, हरिअप्पा तावस्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय, अणदूर
अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ.नागनाथ कुंभार, ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच प्रबोध कांबळे, पोलीस पाटील जावेद शेख, परमेश्वर भुजबळ, नितीन कांबळे, उमेश गायकवाड, पंढरी मातोळकर आदी उपस्थित हाेते.
नूतन प्राथमिक विद्यामंदिर (फाेटाे आहे)
उस्मानाबाद - शहरातील नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिवजयंतीनिमित्त शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसाठी वेबिनार घेण्यात आला. याप्रसंगी पत्रकार रवींद्र केसकर, मध्यवर्ती जिजाऊ महोत्सव समितीच्या अध्यक्षा नगरसेविका प्रेमाताई सुधीर पाटील, प्रा.नंदकुमार नन्नवरे, मुख्याध्यापक प्रदीपकुमार यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी विद्यार्थिनी मनस्वी महेश इंगळे हिने पोवाडा सादर केला. सूत्रसंचालन शीतल उटगे यांनी तर आभार दीपाली राऊत यांनी मानले.
नळीवडगावात घेतली निबंध स्पर्धा (जाहीरातदाराची बातमी आहे. फाेटाेसह घ्यावी)
भूम - तालुक्या नळीवडगाव येथे शिवजयंतीनिमित्त सरपंच प्रवणी रणबागुल यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी ग्रामस्वच्छता निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी रोहिदास लोकरे, पप्पू औटी, नवनाथ महानवर, भीमा झिटे, हनुमंत समिंदर, चांगदेव आहिरे, रानबा रनबागुल, बळीराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती. स्पर्धेसाठी शिक्षक अवसारे, गजरे, भोगील, गोलेकर, मुंढे, साबळे आदींनी परिश्रम घेतले.
पंचशील तरुण मंडळ (फाेटाे आहे)
तामलवाडी - सावरगाव येथे पंचशील तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच आनंद बोबडे, रोहित पाटील, सुनील फडके, भिमराव फडके, मिलिंद डोलारे, विकास डोलारे, त्रिंबक फडके, गोरख डोलारे, शिवाजी फडके, विठ्ठल डोलारे, दामू सुरते, दत्ता फडके, चंद्रकांत फडके, रावसाहेब डोलारे, बाळासाहेब फडके, सुब्राव सोनवणे, म्हंकाळ डोलारे, दासू फडके, नवनाथ डोलारे, सुभाष डोलारे, नितीन फडके, विकास फडके, संजय फडके, शेखर फडके, रमेश डोलारे, सोमनाथ फडके, बापू डोलारे, सिद्राम फडके, जालींदर फडके, नंदकुमार फडके आदी उपस्थित हाेते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विकास डोलारे यांनी केले.
मावळा प्रतिष्ठान, उमरगा (फाेटाे आहे)
उमरगा - येथील मावळा प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पतंगे रोड परिसरात शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी आकर्षक डेकोरेशन व रोषणाई करण्यात आली होती. काळा मठ चौकात प्रतिष्ठाणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आसनावर बसलेला पुतळा असलेला भव्य सेट लावण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी छत्रपतीच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषी जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुलतान, सेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, बाळासाहेब माने, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, संतोष सगर, ओम जगताप, सुभाष येळीकर, योगेश तपसाळे, शरद पवार, गोपाळ जाधव, विक्रम पाचंगे, संदीप चौगुले, विक्रम शहापुरे, अमित सांगवे आदी उपस्थित हाेते.
शिवनेरी रिक्षा संघटना, उस्मानाबाद (फाेटाे आहे)
उस्मानाबाद - शहरातील सांजा रोड येथे शिवनेरी ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पं.स. सदस्य नायकल, पत्रकार धनंजय रणदिवे, सरपंच संताजी पवार, उपसरपंच सतीश सूर्यवंशी, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन सुहास कदम, रणजीत कदम, शिवराज्याभिषेक समितीचे विष्णू इंगळे, काकडे, शिवनेरी ऑटो रिक्षा संघटनेचे मार्गदर्शक देवा काकडे, अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, उपाध्यक्ष सत्यविजय मोहिते, सचिव बालाजी झोंबाडे, कोषाध्यक्ष बाळू सावंत, विशाल सूर्यवंशी, गफूर शेख, श्रीकांत कदम, दत्ता कोळी, पिंटू सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, संभाजी सूर्यवंशी, अलीम शेख, मंजूर शेख, समाधान चोपडे आदीसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात (फाेटाे आहे)
उस्मानाबाद : येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डाॅ.विकास सरनाईक, प्रभारी प्राचार्य डाॅ.ए.बी. इंदलकर, उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर यांनी मानले.
शिक्षक पतसंस्थेत, उस्मानाबाद
उस्मानाबाद: तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन रणजीत कदम, व्हाइस चेअरमन तय्यब अली शहा, पत्रकार धनंजय रणदिवे, माजी चेअरमन राजकुमार माने, प्रशांत माने, संस्थेचे मार्गदर्शक विकास मगर, लगदिवे, ज्ञानेश्वर केवलराम, राजेश तनमोर, खुदबुद्दीन शेख, प्रशांत पाटील, धनंजय सूर्यवंशी, सरडे, कर्मचारी बाळासाहेब मगर, राजाभाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित हाेते.