चिमणी, वन्य, जल दिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:34 AM2021-03-23T04:34:36+5:302021-03-23T04:34:36+5:30

तुळजापूर : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात २० मार्च जागतिक चिमणी दिवस, २१ मार्च जागतिक वन्यदिन आणि २२ मार्च जागतिक ...

Chimney, wild, water day events | चिमणी, वन्य, जल दिनानिमित्त कार्यक्रम

चिमणी, वन्य, जल दिनानिमित्त कार्यक्रम

googlenewsNext

तुळजापूर : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात २० मार्च जागतिक चिमणी दिवस, २१ मार्च जागतिक वन्यदिन आणि २२ मार्च जागतिक जल दिन असल्याने या तिन्ही दिनाचे औचित्य साधून ‘पर्यावरण-२०२१’ या भित्ती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. तसेच इतरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या हस्ते या भित्तीपत्रकाचे अनावरण पार पडले. या निमित्त महाविद्यालयात पर्यावरण , मत्स्यशास्त्र, नॅक विभागाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. या मध्ये चिमणी दिन, वन्यदिन, जलदिन याचे लेख आणि चित्राचे भित्तीपत्रक नॅक समन्वय डॉ. प्रवीण भाले, मत्स्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर आणि रसायनशास्त्र विभागाच्या प्रा. स्नेहा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऋतुजा घोरपडे, स्नेहा जाधव, अनिकेत कदम, दिव्या देशमुख, प्रीती जाधव यांनी बनवले होते.

प्रारंभी उल्हास बोरगावकर यांचे स्वागत प्राचार्य डॉ. मोहन बाबरे यांनी केले. तसेच प्राचार्य डॉ. मोहन बाबरे ,उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, सिनेट सदस्य प्रो. डॉ. गोविंद काळे यांचे स्वागत प्रो. डॉ.अनिल शित्रे, प्रा. डॉ.प्रवीण भाले यांनी केले. प्रास्ताविक प्रा. स्नेहा ठाकूर, सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रवीण भाले यांनी मानले.

कार्यक्रमास प्रो. डॉ. शेषेराव जावळे, प्रो. डॉ. सुरेंद्र मोरे, प्रा. डॉ. शशिकला भालकरे, प्रा. अनिल पाटील, प्रा. डॉ. अंबादास बिराजदार, प्रा. डॉ. पांडुरंग शिवशरण तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राजू बनसोडे, माऊली माने, बासूतकर, समीर शेख, ताकमोघे यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Chimney, wild, water day events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.