रस्ता कामासाठी नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:45+5:302021-05-29T04:24:45+5:30

कळंब : शहरापासून जवळच असलेल्या साईनगर सोसायटीसमोरील रस्ता रस्ते विकास महामंडळाने तत्काळ तयार करावा, अन्यथा लोकशाही पध्दतीने आंदोलन उभारू, ...

Citizen aggression for road work | रस्ता कामासाठी नागरिक आक्रमक

रस्ता कामासाठी नागरिक आक्रमक

googlenewsNext

कळंब : शहरापासून जवळच असलेल्या साईनगर सोसायटीसमोरील रस्ता रस्ते विकास महामंडळाने तत्काळ तयार करावा, अन्यथा लोकशाही पध्दतीने आंदोलन उभारू, असा इशारा साईनगरमधील रहिवाशांनी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बहुचर्चित पालखी मार्ग खामगाव - पंढरपूर या राज्य महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. परंतु, शहर मर्यादित चार पदरी तर बाहेर दोन पदरी असलेले हे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. यातच गतवर्षी मांजरा नदीजवळ वर्षभरापूर्वी कंत्राटदाराने खोदकाम केले असून, मेघा कंपनीने कसेबसे हे काम उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पूर्ण केले आहे. याच रोडला लगत असलेली साईनगर वसाहत मोठी आहे. या वसाहतीत जवळपास ६५ कुटुंब राहतात. या रोडवर जाण्यासाठी साईनगरवासीयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. साईनगरचा रस्ता व कंत्राटदाराने बनवलेला राज्य महामार्ग यामधील उंची जवळपास पाच ते सात फूट असून, यावर चढ - उतार करण्यासाठी कंत्राटदाराने पर्यायी मार्गदेखील केलेला नाही. साईनगर गेट ते राज्य महामार्ग असा एकूण दोनशे फुटाचा रस्तासुद्धा या कंत्राटदाराने न केल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पंधरा दिवसात रस्ता न झाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करू, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

या निवेदनावर साईनगर हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष संजय देवडा, सचिव विलास मुळीक, यशवंत हारकर, सचिन एरंडे, चंद्रकांत दशवंत, प्रशांत सलगरे, सूर्यकांत वाघमारे, जयपाल शिंदे, भागवत मोरे, सुशील सोनी, नानासाहेब कवडे, बाबासाहेब कांबळे आदी रहिवाशांच्या सह्या ओहत.

Web Title: Citizen aggression for road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.