४५ वर्षांपुढील नागरिकांना आज मिळणार कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:24 AM2021-06-01T04:24:41+5:302021-06-01T04:24:41+5:30
उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नसल्याने सजग नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, जिल्ह्यास मागणीच्या ...
उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नसल्याने सजग नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, जिल्ह्यास मागणीच्या तुलनेत कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे लसीच्या पुरवठ्यानुसार मोजक्याच केंद्रांवर लस दिली जात असून, मंगळवारी जिल्ह्यातील सहा केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार आहे.
लसीकरणासाठी चौदा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात शहरातील वैराग रोड परिसरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, राम नगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उमरगा, तुळजापूर, कळंब व परंडा या चार ठिकाणची उपजिल्हा रुग्णालये व त्यासोबतच मुरुम, सास्तूर, लोहारा, तेर, वाशी, भूम येथील ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. वैराग रोड परिसरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर फ्रंटलाईन वर्कर यांना लस घेता येणार आहे. पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुसरा डोस मिळणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.