४६ केंद्रांवर मिळणार ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:31+5:302021-06-25T04:23:31+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा कमी होऊ लागला आहे. मात्र कोरोना संसर्गाचा धोका टळलेला नसल्याने ...
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा कमी होऊ लागला आहे. मात्र कोरोना संसर्गाचा धोका टळलेला नसल्याने नागरिक लस घेण्यास पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने काही मोजक्याच केंद्रावर लस उपलब्ध करून देली जात आहे. शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४४ गावात व उस्मानाबाद शहरातील दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस घेता येणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका टळलेला नाही. येत्या काही महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. आरोग्य विभागाकडून लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. सध्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांकडून लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४४ गावांमध्ये व उस्मानाबाद शहरातील दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस घेता येणार आहे.
या गावांमध्ये मिळणार लस
उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली तांडा, कोल्हेगाव, आनंदवाडी, बुकंनवाडी, महालंगी, थुत्ता, आंबेवाडी, पिंपरी, बरमगाव, सकनेवाडी.
तुळजापूर तालुक्यातील आरळी खु, बोरगाव, मानमोडी, गंजवाडी, गोंधळवाडी, जवळगा मेसाई, कसई.
उमरगा तालुक्यातील दगड धानोरा, वंठाळ, येळी, बेळंब तांडा, एकोंडी ज.
लोहारा तालुक्यातील नागराळ, हराळी, माळेगाव, अचलेर.
कळंब तालुक्यातील रायगव्हाण, भोसा, तांदुळवाडी, सापनाई, भोगजी, पिंपळगाव डोळा,
वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी, यसवंडी, दस्मेगाव,
भूम तालुक्यातील घाटनांदुर, वारेवडगाव, रामकुंड, वाजंरवाडी, सावरगाव पा.
परंडा तालुक्यातील ढगपिंपरी, खानापूर, भोत्रा, धोत्री.
१८ ते ४४ वयोटास १० केंद्रावर डोस
शुक्रवारी १८ ते ४४ वयोगातील नागरिकांना मुरूम, लोहारा, सास्तूर, भूम, वाशी, तेर ग्रामीण रुग्णालयात, कळंब, तुळजापूर, परंडा, उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात लस मिळेल.